भविष्याची गोष्ट; जाणून घ्या तुमच्या राशीचे स्वभाव वैशिष्टये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भविष्याची गोष्ट; जाणून घ्या तुमच्या राशीचे स्वभाव वैशिष्टये}

भविष्याची गोष्ट; जाणून घ्या तुमच्या राशीचे स्वभाव वैशिष्टये

-पूजा चौधरी

पत्रिकेतील राशी ग्रह, तारे, योग यांवर तुमचा विश्वास नसेलही परंतु प्रत्येकजण उत्सुकता म्हणून का होईना रोजच्या वर्तमान पत्रात येणारे राशीभविष्य वाचतो. प्रत्येक व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या आद्याक्षरावरून व्यक्तीची राशी ठरत असते. आणि प्रत्येक राशीला स्वभाव असतो त्यानुसार संबंधित व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज घेता येतो. १२ राशींचे स्वभाव वैशिष्टये , उत्तम करिअरचे क्षेत्र, उद्भवू शकणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी याबाबद्दलची थोडक्यात माहिती या बारा राशींच्या वर्णनातून वाचता येईल.


जाणून घ्या तुमच्या राशीचे स्वभाव वैशिष्ट्ये -

१. मेष राशी :
राशी स्वामी- मंगळ
भाग्यवर्षे- २८
अधिदेवता- गणपती
बोधचिन्ह- मेंढा

स्वभावाने तापट, मानाने दिलदार , व्यवहारी वृत्तीचे, लवकर रागावणारी, बेधडक वृत्ती, कामात काटेकोर, चंचल स्वभावाचे, आर्थिक नियोजन उत्तम करणारे, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करणारे, सडेतोड वागणं आणि बोलणं, बाह्य जगात रमणारे, समविचारी लोकांमध्ये मिसळणारी, परोपकारी, दुसऱ्यावर हुकूमत गाजवणारी, महत्वाकांक्षी असलेली राशी, कोणत्याही समस्येला घाबरून न जाता परिस्थितीशी दोन हात करणारे असतात.
निर्णय घेताना तडकाफडकी आणि तत्परतेने घेतात. भावनेच्या आहारी जात नाही. दुसऱ्यावर बाजू सहजपणे उलटतात.
कार्यक्षेत्र- पोलीस खाते, गुप्तखाते, वैमानिक, व्यापारी, बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करणारे, लष्करी अधिकारी, खेळाडू.
आरोग्य- रोगप्रतिकार शक्ती उत्तम, उष्णतेचा त्रास, तोंड येणे, डोळे लाल होणे, पित्ताचा त्रास.

हेही वाचा: अंटार्क्टिकाचे भवितव्य


२. वृषभ राशी :
राशी स्वामी- शुक्र
भाग्यवर्षे- २५
अधिदेवता- कुबेर, इंद्र, लक्ष्मी
बोधचिन्ह- बैल

नम्र, निष्कपट स्वभावाचे, उंच धष्टपुष्ट, प्रचंड कष्ट, विद्येविषयी आस्था बाळगणारे, आज्ञाधारी, खवय्ये, सौंदर्य बद्दल जागरूक असणारे, वस्त्रे, दागदागिने, परफ्यूम्स ची आवड असणारे, व्यवहार शून्य, दिलदारपणा, नवनिर्मितीची आवड असणारी राशी, कमकुवत निर्णय क्षमता, अपयशाकडे दिलखुलासपणे बघतात. इतरांसाठी खर्च करण्याची वेळ आली तर मागेपुढे बघत नाही. जीवनार प्रेम करणारी हे राशी आहे.ब्रँडेड वस्तू वापरण्याची सवय असते.
कार्यक्षेत्र: संगीत, अभिनय, मॉडेलिंग, फॅशन डिझायनिंग, फायनान्स, कमी श्रमात भरपूर पैसे मिळणारे व्यवसाय.
आरोग्य- उत्तम रोगप्रतिकार शक्ती, श्वसन नलिका किंवा अन्ननलिकेचे आजार, खोकला, हृदयविकार, गुप्तेंद्रिया संबंधित आजार

३. मिथुन:
राशी स्वामी- बुद्ध
भाग्यवर्षे- ३२ ते ३६
अधिदेवता- सरस्वती
बोधचिन्ह- पती पत्नी

चंचल, हुशार, आकर्षक, बोलका स्वभाव, दुसऱ्याला न दुखणारी राशी, फ्लेक्सिबल, हजरजबाबी, लहरी, धरसोड वृत्ती, विनोदी वृत्ती, डोक्याने विचार करणारे, चिकित्सक स्वभाव, क्षत्रिय विषयात रुची ठेवणारे, गोष्टी लवकर आत्मसात करणारे.शब्दांचा शस्त्रासारखा वापर करतात. स्वताःच्या मनाप्रमाणे वागून जीवनाचा आनंद घेतात.
कार्यक्षेत्र: संशोधक, मार्केटींग, ग्रंथपाल, कवी मनाचे, संपादक, वकिल, शिक्षक, बौद्धिक कार्यक्षेत्र, लेखक, मिमिक्री, बँक कर्मचारी,जादूगार, संज्ञापन क्षेत्र .
आरोग्य- रोगप्रतिकार शक्ती कमी, रक्तदाब, मणक्याचे आजार , कफ, त्वचा रोग, दमा, चक्कर, हवामान बदलाचा त्रास.

४. कर्क:
राशी स्वामी- चंद्र
भाग्यवर्षे- २४ ते २८
अधिदेवता- पार्वती, विष्णू
बोधचिन्ह- खेकडा

स्वावलंबी, हळवी, प्रेमळ, व्यवहारी वृत्ती कमी, निष्ठावान, एकाच पद्धतीने विचार करणारी राशी, चंद्राची शीतलता असणारे, प्रलोभनांना बळी पडणारी, वैचारिक अस्थिरता, गंभीर, भिडस्त, भावनाप्रधान, परिस्थितीप्रमाणे बदल स्वीकारणारे, नेतृत्वगुण असणारे, स्वयंपाकाची आवड असणारे, प्रबळांशी नमते आणि दुर्बलांवर आक्रमण करणारे, चंद्राच्या कलेप्रमाणे खुलणाऱ्या या राशीच्या व्यक्ती असतात.
कार्यक्षेत्र: शिक्षक, लेखक, ज्योतिषी, समाजसेवक, दुग्धजन्य पदार्थ किंवा भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे, अभिनय, इस्टेट एजन्ट, फोटोग्राफर, सुगंधी पदार्थांचे विक्रेते, सोने चांदीचे व्यापारी.
आरोग्य- पचनसंस्था, सर्दी, ताप, कावीळ, न्यूमोनिया यांसारख्या साथीच्या आजारांना लवकर बळी पडणारे, रक्ताचे विकार, अपचन, हवामान बदलाचा त्रास

हेही वाचा: आरोग्यदायी बदाम खा अन् सुदृढ रहा!

५.सिंह:
राशी स्वामी- सूर्य
भाग्यवर्षे- २२ ते २६
अधिदेवता- सूर्य, मार्तण्ड भैरव
बोधचिन्ह- बसलेला सिंह

दूरदर्शी, धाडसी, नेतृत्वगुण असणारे, तडकफडकपणा, दुसऱ्याकडून उत्तमरित्या काम करवून घेणारे, लवकर राग येणारे, मी पणा असणारे, प्रामाणिक, कायद्याचे पालन करणारे, स्तुतीप्रिय, वक्तशीरपणा, स्पष्टवक्ते, कुणापुढे न झुकणारे, कुटुंबवत्सल, औपाचारिक, स्वच्छता, शिस्तबद्ध, उच्च राहणीमान असणारे असतात, कौतुक व स्तुतीप्रिय असतात.दुसऱ्याचे कौतुक लवकर करत नाही. पण कौतुक केले तर ते मात्र मनापासून असते.
कार्यक्षेत्र: समाजकारण, आरोग्यविषयक क्षेत्र, व्यवस्थापक, विज्ञान शाखा, सल्लागार, कंपनीतील उच्च अधिकारी, जज, डॉक्टर, दिद्गदर्शक, क्लास वन ऑफिसर.
आरोग्य- हृदयविकार, डोकेदुखी, पित्ताचा त्रास, मज्जातंतू व स्नायूंचे विकार, कापणे, भाजणे.

६.कन्या :
राशी स्वामी- बुध
भाग्यवर्षे- ३२ ते ३६
अधिदेवता- विष्णू
बोधचिन्ह- नौकाविहार करीत असणारी मुलगी जिच्या एका हातात कणीस तर दुसऱ्या हातात अग्नी

चिकित्सक, कल्पना शक्ती उत्तम , अध्यात्मिक, तापटपणा, समीक्षक, आसक्ती, हव्यास असणारे, बुद्धिमान, व्यवहार कौशल्य असणारे, अनेक शास्त्रांचा अभ्यास असणारे, निसर्गाचा आनंद घेणारे, उत्तम विश्लेषक, संशयी वृत्तीचे, अतिस्वच्छता, एखाद्या गोष्टीचा फोबिया असणारे, प्रवासाची आवड असणारे.
या व्यक्ती हुशार असतात. हाती घेतलेले काम निष्ठेने पूर्ण करतात, स्वस्थ बसल्यावरही हात-पाय हलवण्याची सवय असते.
कार्यक्षेत्र: कायदे पंडित, संपादक, ज्योतिषी, प्रोफेसर, संगीत क्षेत्र, कला क्षेत्र, स्टेशनरी, नर्सिंग, ग्रंथकार, सीए, सीएस, शास्त्रज्ञ, वक्ता, परकीय भाषेत संधी.
आरोग्य- रोगप्रतिकार शक्ती कमी, पोटाचे विकार, ऍसिडिटी, मळमळणे, त्वचा विकार, चक्कर, मानसिक रोग, डोकेदुखी, मज्जातंतू विषयक विकार.


७. तुळ:
राशी स्वामी- शुक्र
भाग्यवर्षे- २५
अधिदेवता- लक्ष्मी
बोधचिन्ह- तराजू

सुसंकृत, संधीसाधू, बाह्य जगात रमणारी, नम्र, हौशी, सत्यप्रिय, कलाप्रिय, प्रवासाची आवड, अध्यात्माची आवड, बौद्धिक पातळी उत्तम, बुद्धीला पटल्याशीवाय कृती न करणारे, आव्हाने स्वीकारणारे, समतोल राखणारे, शुद्ध हेतूने प्रेम करणारे, आश्वासक, भावुक, शिष्टाचार सांभाळणारे, प्रत्येक गोष्ट पारखून घेणारे असतात.अत्यंत गमनशील, तुला राशीच्या व्यक्ती प्रज्ञावान असतात.
कार्यक्षेत्र: ज्योतिष, गूढ शास्त्र, कलेशी निगडीत शिक्षक, व्यापारी, इव्हेंट मॅनेजमेंट, वकील, न्यायधीश, दलाली, सुगंधी वस्तूचे व्यापारी, एअर होस्टेस, लेखक, कवी, क्रिकेट, रत्नांचे व्यापारी.
आरोग्य- त्वचा विकार, मूत्राशय, ओटीपोट विकार, गर्भाशयाचे विकार, रक्तदाब, शीत विकार, पित्त विकार, मधुमेह, गॅसेसचा त्रास.

८. वृश्चिक:
राशी स्वामी- मंगळ
भाग्यवर्षे- २८ ते ३२
अधिदेवता- रुद्र, कालभैरव
बोधचिन्ह- विंचू

धूर्त, स्वार्थी, एकांतप्रिय, संशयी, कष्टाची तयारी, बदलास सामोरे जाणारे, सडेतोड बोलणारे, नेतृत्वगुण असणारे, राजकारणाची आवड असणारे, हुशार, कलाप्रिय, गूढपणा, मार्मिक बोलणारे, बेधडक, स्वतःला कार्यात झोकून देणारे, प्रेमळ, शक्ती आणि भक्तीचा योग्य मिलाफ असणारे.
एखाद्याला त्याची जागा दाखवून देण्यात या राशीच्या व्यक्ती पटाईत असतात.
कार्यक्षेत्र : मिलिटरी, पोलीस, फॉरेस्ट डिपार्टमेंट, सर्जन, सीआयडी, अमली पदार्थांचे व्यवसाय करणारे, गुप्तहेर, इंजिनियर,.
आरोग्य- किडनीचे विकार, मूळव्याध, वाट विकार, गर्भाशय, मूत्र नलिका, बीपी, कावीळ, उष्णतेचे विकार, विषबाधा, गुप्तरोग, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होणारे विकार.

९.धनु:
राशी स्वामी- गुरु
भाग्यवर्षे- १६ ते २०
अधिदेवता- ब्रह्मा
बोधचिन्ह- धनुर्धारी अश्वारूढ मानवाची आकृती

प्रामाणिक, तत्वज्ञानी, कडक शिस्तप्रिय, नीटनेटकेपणा , अन्याय विरोधी भूमिका घेणारे, ध्येयवादी, हेकट, हट्टी, नेतृत्वगुण असणारे, आक्रमक प्रवृत्ती, समाजकार्य करणारे, महत्वकांक्षी, द्विस्वभावी, धाडसी, प्रॅक्टिकल वागणारे, दहशत निर्माण करणारे, अध्यापनाची आवड असणारे.
कार्यक्षेत्र : संस्थापक, ज्योतिष, न्यायाधीश, बँक क्षेत्रातील कर्मचारी, कुलगुरू, पौरोहित्य करणारे, केटरिंग क्षेत्र, संशोधक.
आरोग्य- मूळव्याध, उष्णतेचे रोग, पाठीच्या मणक्याचे रोग, फुफ्फुसाचे विकार, पोटाचे विकार, मेदाचे प्रमाण वाढणारे, मधुमेह.


हेही वाचा: तमिळनाडूत सुरक्षित आहे मराठ्यांचा इतिहास!

१०.मकर:
राशी स्वामी- शनी
भाग्यवर्षे- २६
अधिदेवता- शिव
बोधचिन्ह- मगरीचे शरीर आणि हरणाचे तोंड

कर्तव्यदक्ष, स्पष्टवक्ते, प्रचंड कष्ट करणारे, सहनशील, मुद्देसूद बोलणारे, बचत करणारे, कंजूस, न्यायप्रिय, लढवय्ये , संशयी प्रवृतीचे, उत्तम दूरदृष्टी व आर्थिक नियोजन करणारे, प्रपंच व परमार्थ यांचा समन्वय असणारे, चिकित्सक, साधी राहणी, समाज कार्याची आवड असणारे, उत्तम सौंदर्य दृष्टी असणारे.
कार्यक्षेत्र : हवाई दल, गुप्तहेर, वकील, तर्क शास्त्र, संशोधन क्षेत्र, लोखंडाचे व्यापारी, प्रिंटींग व्यवसाय, फर्निचर व्यावसायिक, इंजिनीयर, फायनान्स क्षेत्र, फ्रोझन फूड बिसनेस.
आरोग्य- गुडघेदुखी, संधीवात, दमा, दीर्घकालीन आजार, त्वचाविकार, हृदयातील व्हॉल्व चा विकार, वारंवार होणारे आजार.


११. कुंभ:
राशी स्वामी- शनी
भाग्यवर्षे- ३०
अधिदेवता- शिव
बोधचिन्ह- खांद्यावर पाण्याचा घडा घेतलेला मानव

दिलदार, व्यवहारशून्य, बुद्धिमान, संवेदनशील, चिकाटी, धूर्त, आळशी, हट्टी, लोभी नसणारे, परिपक्व, नवीन शिकण्याची आवड असणारे, अध्यात्म आणि शास्त्र यांचा उत्तम मिलाफ असणारे, विक्षिप्त स्वभाव, संयमी, संसारात रमणारे, सत्यप्रिय, ऐहिक सुखाच्या मागे न लागणारे, मवाळ स्वभावाचे.
कार्यक्षेत्र : संशोधक, वकील, इंजिनियर, सीए, आयकर सल्लागार, तेलाचे व्यापारी, आयात निर्यात क्षेत्र, धातूंचा व्यापार, गूढ शास्त्र, अंतराळ.
आरोग्य: हृदय विकार, रक्ताचे विकार, अस्थमा, संधीवात, मानसिक आजार, रोगप्रतिकार शक्ती मध्यम, पाय पोटऱ्या यांचे आजार, विस्मरण, झोपेचे विकार.


१२. मीन :
राशी स्वामी- गुरु
भाग्यवर्षे- १६ ते २०
अधिदेवता- विष्णू
बोधचिन्ह- उलट सुलट दोन मासे

संवेदनशील, अदूरदर्शी, अस्थिर, प्रेमळ, परोपकारी, लवकर फसवणूक होणारे, निस्वार्थी, कायम आधाराची गरज भासणारे, कमी श्रम घेणारे, दयाळू, भावुक, खरे प्रेम करणारे, शारीरिक कष्ट न झेपणारे, लवकर वाहवत जाणारे, स्वतःच स्वतःवर नियम लादून घेतात.
कार्यक्षेत्र : बँक, खाजगी कंपन्या, मत्स्य व्यवसाय, कला क्षेत्र , शिक्षक, न्यायाधीश, पौरोहित्य, नौदल, द्रव पदार्थांचे विक्रेते, खलाशी.
आरोग्य- शीत विकार, मधुमेह, साथीचे विकार, कफ, मेदाचे प्रमाण वाढून होणारे विकार, पचन संस्थेचे विकार, लवकर बरे न होणारे आजार, रोग प्रतिकार शक्ती कमी असते.

टॅग्स :India
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top