विंटर सिझनमध्ये करा सागरी सफर! Premium Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विंटर सिझनमध्ये करा सागरी सफर!}

विंटर सिझनमध्ये करा सागरी सफर!

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील दक्षिणेकडचा सगळ्यात शेवटचा जिल्हा. सिंधुदुर्गानंतर गोवा राज्य लागते. अर्थात गोव्यानंतर आता सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांमुळे आणि वॅाटर स्पोर्टसमुळे सिंधुदुर्गातील सागरी पर्यटन बहरत आहे. हिवाळ्यात येथील सागरी किनाऱ्यांना भेट देण्याचा तुमचा फॅमिली प्लॅन असेल तर तुमच्यासाठी ही खास ठिकाणे आहेत.


सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा असून, सिंधुदुर्गातील समुद्रकिनारे पर्यटनाने बहरत आहे. सिंधुदुर्ग गोव्यापेक्षा काही वेगळा नाही. गोव्यातील नाईट लाईफ सोडली तर सिंधुदुर्गात सागरी पर्यटनासाठी आवश्यक जलक्रिडा (Water Sports)नावारूपाला येत आहे. मालवण, तारकर्ली, रेडी, वेंगुर्ले, या ठिकाणी तुम्ही वॅाटर स्पोर्टसला जाऊन मनमुराद आनंद लुटू शकतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२० कि. मी. लांबीचा समुद्र किनारा आहे. अर्थातच सिंधुदुर्गमध्ये असणाऱ्या समुद्र किनाऱ्यांची संख्या एकंदरीत गोवा राज्यापेक्षा जास्त आहे.


जर आपण गोवा राज्याची तुलना महाराष्ट्र राज्याच्या किनाऱ्याच्या लांबीशी केली तर महाराष्ट्राला ७२० कि. मी. लांबीचा समुद्र किनारा आहे, म्हणजेच ६१७ कि. मी. अधिक सुमुद्र किनारा आपल्या राज्याला लाभला आहे.

हेही वाचा: फुटबॉल विश्वाचे वर्ष २०२१!

या किनाऱ्यांना नक्की भेट द्या


तारकर्ली, देवबाग, भोगवे, शिरोडा, रेडी, निवती, आचरा, मोचेमाड, तांबळडेग – मिठबांव, कुणकेश्वर, तारा मुंबरी, देवगड, चिवला, कोंडुरा,खवणे

१. तारकर्ली


तारकर्ली बीच ला भारतातील नं. १ बीच असे संबोधले जात होते. सध्या CNN च्या नवीन यादी प्रमाणे तारकर्ली हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा बीच आहे. मालवण तालुक्यात समुद्राच्या किनारी वसलेलं हे छोटस गाव. मालवण तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण ८ कि. मी. अंतरावर तारकर्ली बीच आहे. पर्यावरणच्या दृष्टीने सुसज्ज असा हा बीच आहे. वॉटर स्पोर्टचा भरपूर आनंद तुम्ही येथे घेऊ शकता. स्नोर्केल्लिंग, स्कुबा डायविंग, पॅरासिलींग, बोट हाऊस असे विविध प्रकार तुम्ही तारकर्ली बीच वर करू शकता.

२. देवबाग


तारकर्ली बीचला लागूनच देवबाग हे छोटासा गाव आहे. तारकर्लीच्या प्रसिद्धतेमुळे देवबागचा उल्लेख तास होत नाही पण तारकर्ली बीच बरोबरच त्याला जोडले जाते. तारकर्लीप्रमाणे एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र देवबाग आहे, पण देवबागच वेगळेपण दडलंय हे खाडी आणि नदीच्या संगम स्थळामुळे. तारकर्लीप्रमाणेच देवबागला देखील तुम्ही वॉटर स्पोर्टच आनंद घेऊ शकता.

हेही वाचा: दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’

३. भोगवे

देवबागच्या संगम बीचवरून तुम्हाला भोगवे बीचचे दर्शन होते. असं तरी हा बीच कुडाळ तालुक्यात येतो. बाकीच्या तालुक्यांची तुलना करता कुडाळ तालुक्याला तसे फार कमीच बीच आहेत. पण पांढऱ्या शुभ्र वाळूची चादर ओढलेला भोगवे बीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.

४. शिरोडा

वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा बीच म्हणजे एखाद्या उत्तम चित्रकाराने रेखाटलेले एक विहंगमय दृश्य. एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला माडांच्या रांगा आणि त्यामध्ये मच्छीमाऱ्यांच्या झोपड्या. तुम्ही या बीचवर विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स देखील करू शकता. जेट स्कीईंग हे सगळ्यात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पॅराग्लायडींचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

५. निवती

निवतीचा समुद्रकिनारा हा दोन भागात विभागाला गेला आहे आणि त्यातच त्याच वेगळेपण दडलेलं आहे. उंच उंच दगड, निळेभोर पाणी, पांढरी शुभ्र वाळू आणि शांत लाटा असा हा निवतीचा समुद्रकिनारा आहे. निवती समुद्रकिनाऱ्याला भेट दिल्यावर अगदी हिंद महासागरातल्या बेटांच्या समुद्रकिनाऱ्यांसारखा आहे.

हेही वाचा: Corona Virus : मास्कपासून मुक्ती कधी?

६. रेडी

वेंगुर्ल्यातील रेडीची समुद्र किनारा तास फारसा मोठा नाही पण शिरोडाचा समुद्र किनारा आणि रेडीचा समुद्र किनारा यांच्या मधून वाहणाऱ्या अरबी समुद्र आणि तिरोबा खाडी यांच्या संगमामुळे एक विलक्षण आकर्षण तयार झालाय.

७. आचरा

वरती पाहिलेल्या सर्व समुद्रकिनाऱ्यांमध्ये सगळ्यात मोठा आचऱ्याचा समुद्रकिनारा आहे. त्याच कारण असं की, हा लांब समुद्र किनारा चार समुद्रकिनाऱ्यांचा बनलेला आहे. त्या मध्ये आचार, वायंगणी, तोंडवळी आणि तळाशील या समुद्रकिनाऱ्यांपासून बनलेला आहे.

हेही वाचा: धरणांमध्ये बुडालाय मावळ्यांचा गौरवशाली इतिहास

८. मोचेमाड

वेंगुर्ला तालुक्याच्या ठिकाणापासून मोचेमाड बीच हा अवघ्या ९ कि. मी. अंतरावर आहे. आकाराने जरी हा समुद्रकिनारा छोटा असला तरी येथे पर्यटकांची वर्दळ बऱ्या पैकी असते. पांढरी शुभ्र वाळू सूर्यास्ताला सोनेरी रंगाची जणू चादरच ओढते.

९. तांबळडेग – मिठबांव

तांबळडेग हे देवगड तालुक्यातील समुद्र आणि खाडी यांच्या मधोमध वसलेलं एक छोटंसं गाव आहे. तास बघता हा समुद्र किनारा दोन गावांमध्ये विभागाला गेला असला तरी खूपच छोटासा म्हणजे जवळ पास १०० ते १५० मी. एवढा भाग हा मिठबाव या गावात येतो. जर तुम्हाला एखादा शांत समुद्र किनारा हवा असेल तर तांबळडेग – मिठबांव हा सर्वात उत्तम पर्याय आहे.


१०. कुणकेश्वर

कुणकेश्वर हे सिंधुदुर्गातील तसेच महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या देवस्थानाला भेट देतात. हे देवस्थान सुमुद्रा किनाऱ्याला लागून असल्यामुळे येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत. जागृत देवस्थान आणि समुद्र या दोन्ही गोष्टींमुळे पर्यटक नेहमीच कुणकेश्वरला भेट देतात.

हेही वाचा: महापालिका निवडणूक पुढे ढकलणे कोणाच्या पथ्यावर?

११. तारा मुंबरी

गेली अनेक वर्ष देवगड तालुक्याचं कुशीत लपलेला हा समुद्र खऱ्या अर्थाने सर्व लोकांच्या निर्दशनास आला जेव्हा देवगड आणि मीठ मुंबरी या दोन गावांना जोडणारा पूल सुरु झाला. समुद्राला लागून खाडी असल्यामुळे खाडी आणि समुद्र यांचा संगम असं एक विलक्षण दृश्य पाहावयास मिळते.

१२. देवगड

देवगडचा समुद्र किनारा जरी छोटा असला तरी दोन डोंगरांच्या मध्ये असलेला हा समुद्रकिनारा खूप प्रसिद्ध आहे. एका बाजूला पवनचक्की आणि दुसऱ्याबाजूला देवगडचा किल्ला यामुळे पर्यटकांची नेहमीच या समुद्रकिनाऱ्याला पसंती असते.

१३. चिवला

सिंधुदुर्ग म्हटला की, सगळ्यात पाहिलं नाव कोणाच्या पण सहज तोंडावर येत ते म्हणजे मालवण. मालवण तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात विकसित असा तालुका आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा देखील मालवणच्या समुद्रात वसलेला आहे. त्याच मालवण मधील चिवला हा समुद्र किनारा खूपच प्रसिद्ध आहे. अगदी तारकर्ली सारखी गर्दी आपणास या समुद्र किनाऱ्यावर पाहता येईल.

१४. खवणे

वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी असा एक हा खवणे बीच आहे. खवणे समुद्र किनारा दोन भागात विभागाला गेला आहे एक म्हणजे मोठा खवणे बीच आणि छोटा खवणे बीच. अर्थातच नावावरून तुमच्या लक्षात आलाच असेल की, दोन्ही बीचच्या आकारावरून ही नाव पडली आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top