relationship vs Situationship
SituationshipEsakal

'Relationship' पेक्षाही 'Situationship' ला पसंती का? 'कमिटमेंट' देणं इतकं अवघड का जातंय?

दोघांनाही एकमेकांविषयी मैत्रीच्या पलीकडे वाटू लागलंय... दोघांनीही हे मान्य देखील केलंय. पण कमिटमेंट साठी मात्र कोणीच पुढे येईना..

मुंबई : तो २४ वर्षीय. सध्या सीए ची तयारी करतोय.. त्याच्याच कॉलेजमध्ये असणारी ती त्याला आवडते आहे. ती ही त्याच्याच वयाची. दोघांचीही खूप चांगली मैत्री... त्या मैत्रीपलीकडे जाऊनही दोघे रोज बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारण्यात घालवतात... ग्रुपमध्ये राहण्यापेक्षा त्यांना दोघांनाच एकमेकांसोबत राहायला आवडते..

दोघांनाही एकमेकांविषयी मैत्रीच्या पलीकडे वाटू लागलंय... दोघांनीही हे मान्य देखील केलंय. पण कमिटमेंट साठी मात्र कोणीच पुढे येईना.. तो म्हणतोय.. मला आता कुठल्याच रिलेशनशिपमध्ये अडकायचं नाही... अभ्यास, करियर ही माझी टॉप प्रायोरिटी आहे.. तिचंही असंच काहीसं.. काम करत घरची जबाबदारी घ्यायची आहे... करियर करायचे आहे... तरीही दोघांना एकमेकांना सोडवत देखील नाहीये...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com