आदिवासी तरुणाने पेटवलेली
आदिवासी तरुणाने पेटवलेली

अमृत कलशातील सुमधुर स्वर...!

संगीतावरील निष्ठा, तपस्येच्या जोरावर भारतरत्न लता मंगेशकर यांनी मराठी भाषेतच नव्हे तर हिंदीसह इतर भारतीय प्रादेशिक भाषेत गीते सादर केली. ज्या गीतांना त्यांचा स्वर्गीय स्वर लाभला ती अजरामर झाली. त्यांनी सात दशके आपल्या अभूतपूर्व स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज गाजविले. या स्वरसम्राझीने ९८० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी तब्बल ३६ प्रादेशिक भारतीय भाषांतील गाण्यांना अमृत कलशातील सुमधुर स्वर दिला. त्यांचा हा दैवी, अलौकिक स्वर वयाच्या ९३ व्या वर्षी हरपला. त्यांच्या निधनाने एका संगीत युगाचा अंत झाल्याची भावना भारतातीलच काय जगभरातील रसिकांच्या हृदयात निर्माण झाली.


न भुतोः न भविष्यतेः असणारी स्वरसम्राज्ञी काळाच्या पडद्या आड गेल्याने भारतीय संगीत क्षेत्राची प्रचंड मोठी हानी झाली आहे. संगीतातील आत्माच हरवल्याची भावना जगभरातील कानसेनांकडून व्यक्त होत आहे. गंधर्व कन्या, गाण सरस्वती लताजींचे गाणे म्हणजे सप्तसुरांचा इंद्रधनूच. सुरांवर हुकूमत गाजविणाऱ्या स्वरसम्राज्ञीने '‘ऐ मेरे वतन के लोगो’', '‘दीदी तेरा देवर दिवाना'’, 'दिल तो पागल है', ते '‘अवचिता परिमळु'’ ही विराणी आणि ‘'अरे अरे ज्ञाना’' असे अभंग असे अनेकविध विविध भाषांतील ५६ हजारांपेक्षा गाणी गायली आहेत. 'वीरझरा' या चित्रपटासाठी त्यांनी २००४ मध्ये पार्श्वगायन केले. तसेच २०१९ मध्ये भारती जवानांसाठी कार्यक्रम सादर केला होता.

दीनानाथ मंगेशकर यांच्या स्वरवेलीवर २८ सप्टेंबर १९२९ रोजी उमललेलं पुष्प म्हणजे लतादिदी. त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या पाचव्या वर्षी गायनाला प्रारंभ केला. अवघ्या तेराव्या वर्षीच वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे त्यांना आईची व भावंडांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी चित्रपट सृष्टीत प्रदार्पण केले. मा. विनायक यांच्या सहकार्याने त्यांनी १९४२ मध्ये ‘चिमुकला संसार’ या चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळविली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com