पुण्यातील मारुतीची वैशिष्ठ्यपूर्ण नावे अन् त्यांचा इतिहास!

पुण्यातील मारुतीची वैशिष्ठ्यपूर्ण नावे अन् त्यांचा इतिहास!

पुणे ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यासाठी ‘पुणे तेथे काय उणे’ असे आवर्जून म्हंटले जाते. त्यामुळे पुण्यातील देवळांची नावेही जरा इतरांपेक्षा हटके असतील तर त्यात नवल काय!


पुण्यात सर्वांत जास्त देवळे मारुतीची आहेत. पेठा-पेठांत असलेल्या मारुतींना दिलेली गमतीशीर नावे अनेकदा टिंगलवजाही वाटतात. त्यांची ओळख करून घेताना, त्यांची नावे समजून घेताना मोठी मौज वाटते. पुणेकरांच्या तिरकसपणाने देवांचीसुद्धा गय केलेली दिसून येत नाही. पूर्वीच्या काळी बाहेरगावावरून आलेल्या प्रवाशांना पत्ते ओळखण्यासाठी या मंदिरांचा खूप उपयोग व्हायचा, आता मात्र या मंदिरांची ओळख पूसू लागली आहे. मात्र कधीकाळी हिचे मंदिरे रस्त्याची ओळख सांगण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत होते. आता मात्र शहरासह उपनगरांत टोलेजंग मॉल, मल्टिप्लेक्स, रेस्टारंट उभे राहिल्याने या मंदिरांऐवजी मॉल, थिएटरचा पत्ता सांगितला जातो. टेक्नोसॅव्ही असलेली सध्याची तरुणाई गुगल मॅपवर पत्ता शोधू लागली आहे, त्यामुळे मंदिर, त्यांचा इतिहास जाणून घेण्याच्या फंदात पडताना दिसून येत नाही. मात्र, पुण्यातील मारुतींची वैशिष्ट्यपूर्ण नावे व ती ठेवण्यामागील इतिहास जाणून घेणे निश्‍चितच ज्ञानात भर टाकणारे ठरू शकेल, ‘नावात काय आहे’ असं म्हंटल जात, मात्र ‘नावातच सर्वकाही आहे,’ असे फक्त पुणेकरच ठामपणे म्हणू शकतात, तर पाहूया मारुती मंदिरांच्या हटके नावांची ओळख...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com