अडीच वर्षांनी पोहचला तो घरी....! Premium Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lost Man}
अडीच वर्षांनी पोहचला तो घरी....!

अडीच वर्षांनी पोहचला तो घरी....!

वय वर्ष ४५. सात वर्षांत त्याने दोनदा घर सोडलं. महाराष्ट्र (Maharashtra)आणि दिल्ली फिरल्यानंतर अचानक त्याचा एके दिवशी अपघात झाला. चार वर्षांनीच तो कुटुंबियांना मिळाला. ते ही दिल्लीसारख्या (Delhi)शहरातून. दुसऱ्यांदा अडीच वर्षापूर्वी तो घर(Home) सोडून निघून गेला. तो ही चालत. ना एस.टी ना बसचा आधार. एवढ्या मोठ्या शहरांमधूनही कित्येक वर्षांनी तो कुटुंबियांना पुन्हा सापडला. ते ही पिंपरी-चिंचवड सारख्या शहरातून. परंतु, त्याच्यावर कुणी करणी केली म्हणून नातेवाइक बोलू लागले. परंतु, विस्मयकारकच माहिती समोर आली. ती अशी...(Hasib Ahmad Lost Two Times Due To Mental Stress and Depression)

मूळ बिहारमधील गया येथील हसीब अहमद(Hasib Ahmad). गाव वारीस नगर. हसीब हा लहानपणापासून गावात काढ्यांची औषधं बनवून विकत असे. स्वभावाने शांत. मितभाषी. विवाह न करताच तो गावात राहिला. परंतु, कालातंराने त्याच्या आई-वडील दोघांचाही कोरोना काळात मृत्यू झाला. त्याचे छत्रच हरपले. त्याला नैराश्य (Depression)आले. आयुष्यात सर्व गमावल्याने तो एकटा पडला. त्यामुळे दिवसेंदिवस त्याचा ताणतणाव वाढला. भाऊ आणि बहिण व भाच्यासोबत तो राहू लागला. जेमतेम पैसेही कमवत असे. मिळालेल्या कामधंद्यातून त्याचा उदरनिर्वाह होत असे. अचानक २०१२-१३ साली रात्रीचा तो घरातून बाहेर पडला. मानसिक ताण सहन न झाल्याने. कोणालाही न सांगता. प्रचंड तणावाखाली तो गेला. त्याला काय करतोय किंवा कुठे चाललो याचेही भान राहिले नाही. शेवटी रस्तोरस्ती फिरुन तो आणखीनच मनोविकृत झाला. त्यावेळी तो दिल्लीतील रस्त्यांवर रोज फिरत असे. कुटुंबियांनी तो न मिळण्याची आशाच सोडून दिली.

हेही वाचा: कुस्तीला घरघर!

अचानक दिल्ली पोलिसांनी त्याची एके दिवशी विचारपूस केली तेव्हा त्याने बिहारला राहत असल्याचे सांगितले. अगदी विचित्र अवस्थेत तो सापडला होता. पोलिसांनी त्याच्या गावचा पत्ता शोधला आणि त्याच्या गावी संपर्क केला. गावातील काही नागरिकांनी तो आमच्याच गावचा असल्याचे सांगितले. शेवटी बिहारहून नातेवाइक त्याला घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. पोलिसांनी त्याला नातेवाइकांच्या स्वाधीन केलं. तब्बल चार वर्ष उलटून गेली होती. त्यानंतर त्याने पुन्हा गावी जाऊन कामधंदा करण्यास सुरुवात केली. परंतु, त्यानंतरही तो पुन्हा ताण तणावाखाली गेला. रस्त्यावर हिंडून मिळेल तेथे झोपू लागला. अचानक त्याचा अडीच वषापूर्वी चाकण-तळेगाव रस्त्यावर अपघात झाला. बिहारपासून कोसो दूर असलेल्या गावी. जखमी अवस्थेत त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दीड ते दोन महिने त्याच्यावर उपचार सुरु होते. हाडांना जबर मार लागला होता. ‘रिअल लाइफ रिअल पिपल’ या संस्थेने त्याला आधार दिला. त्याची सेवा केली. दहा महिने तो निवारा केंद्रात राहिला. त्याला हक्काचा निवारा मिळाला. परंतु, वायसीएमध्ये दाखल असातनाच त्याच्या कुटुंबियांचा शोध घेणं संस्थेनं सुरु केलं. शेवटी बरा झाल्यानंतर त्याने बिहारला राहत असल्याचे सांगितले. बेघरांना आधार देणाऱ्या या संस्थेने त्याचा सांभाळ केला. त्याच्यावर उपचार केले. कोणाचाही आधार नसताना त्याला आधार दिला. रस्त्यावरचं त्याचं जगणं सुसह्य केलं.

हेही वाचा: सणासुदीला मिठाई घेताय; तर सावधान!

बिहार, गयामधील गावात अखेर ग्रामपंचायतीमधून त्यांना समजलं की, तो वारीसनगर मधील राहणारा आहे. परंतु, लॉकडाउनमुळे हालाखीची परिस्थिती असल्याने कुटुंबियांचे शहरात येणं अवघड झालं होतं. कोरोना काळात बिहारवरुन रेल्वेने त्यांना पिंपरीत येणे अवघड होऊन बसले होते. शेवटी, दहा महिने नातेवाइकांची वाट पहावी लागली. नातेवाइकांच्या संपर्कात राहून संस्थेने त्यांना बोलावून घेतले. नातेवाइक बिहारमधून पिंपरीत आले. बेघरांना आधार देणाऱ्या संस्थेला पाहून त्यांना गहिवरुन आलं. कारण त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती एकदम फुलासारखी त्यांनी सांभाळली होती. उपचारातून काही अंशी ती बरी झाली होती. सर्वांसोबत ती मिळून मिसळून राहत होती. रिअल लाइफ त्यांना कुटुंबासारखीच वाटू लागली.

हेही वाचा: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अर्थतज्ञ अमित बिवलकर यांचा प्रेरणादायी प्रवास; पाहा व्हिडिओ

अधून मधून हसीब स्वत:ला त्रास करुन घेत असे. इजा पोहचून घेत असे. यावरही औषधोपचार सुरु असल्याचे संस्थेने नातेवाइकांना सांगितले. परंतु, बरेचदा तो दुसऱ्या क्षणी नॉर्मल वागत असल्याने सर्वचजण आश्चर्यचकीत होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तो मनोविकृत आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत होता. इतर वेळी तो राहण्या-खाण्यापासून सर्व कामे स्वत:च्या हाताने करत असे. अधून-मधून तो सर्वांशी हसून बोलत असे. भूक लागल्यास पोटभर जेवण करत. केवळ जवळचे नातेवाइक नसल्याने संस्थेला त्याच्यावर उपचार करणे अवघड जात होते. कारण त्याच्या आरोग्याची पार्श्वभूमी त्यांना माहीत नव्हती. कुटुंबियांची सोबत नसल्याने माणूस ताणतणावाखाली जात असल्याचे ज्वलंत उदाहरण सर्वांना जवळून पाहावयास मिळाले. संस्थेचे हुसैन म्हणाले, १५ ऑक्टोबरला संस्थेने बिहारच्या रेल्वेने ७५०० रुपयांचे तिकीट काढून नातेवाइकासहित सुखरुप त्यांच्या गावी पाठवले आहे. घरांपर्यत सेवा दिल्याचे समाधान मिळाल्याचे ते सांगत होते. नातेवाइकांचेही जाताना डोळे भरुन आले. रेल्वे स्टेशनपर्यंत हसीबला सोडवले. परंतु,जड अंतकरणाने आम्ही त्याला निरोप दिला. कारण समाजात ताणतणावातून विपरीत प्रसंग घडत आहेत. काहीजण आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. आम्ही एका जीवाला यातून सावरले. याचा आम्हांला आनंद होत असल्याचे हुसैन यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top