महाराष्ट्रात आहेत काही पूर्ण शाकाहारी गावं....
महाराष्ट्रात आहेत काही पूर्ण शाकाहारी गावं....Esakal

महाराष्ट्रात आहेत काही पूर्ण शाकाहारी गावं....

भारतात शाकाहारी लोकांचं प्रमाण हे सुमारे 31 टक्के असल्याचं सांगितलं जातं. म्हणजेच उर्वरित लोकं ही मांसाहार करणारी आहेत. अनेकांसाठी मांसाहार हा जीव की प्राण आहे. पण, महाराष्ट्रात अशी काही गावं आहेत, जिथे मांसाहार वर्ज्य आहे. तिथले लोकंही मांसाहार करीत नाहीत. शिवाय गावांमध्ये शेळी, कोंबडीही कोणी पाळत नाहीत, इतकंच काय मद्यपानाशीही या लोकांच्या दूरपर्यंत संबंध येत नाही. चला तर मग अशा पाच गावांबद्दल आपण आज जाणून घेऊयात...
Published on

शंभर लोकांमध्ये किमान वीस एक लोक शाकाहारी असतील, तर त्यात नवल वाटावं, असं काहीच नाही. पण, इथे एक-दोन माणसंच नव्हे तर आख्खं गावचं शाकाहारी आहे, असं सांगितल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अनेकांना हे अविश्वसनीय वाटू शकेल. पण, ही संपूर्ण गावंच शाकाहारी आहेत. या गावांमध्ये तुम्हाला एकही व्यक्ती मांसाहार करणारा सापडणार नाही.

भारतात शाकाहारी (Vegeterian) लोकांचं प्रमाण हे सुमारे 31 टक्के असल्याचं सांगितलं जातं. म्हणजेच उर्वरित लोकं ही मांसाहार (Non-veg) करणारी आहेत. अनेकांसाठी मांसाहार हा जीव की प्राण आहे. पण, महाराष्ट्रात (Maharashtra) अशी काही गावं आहेत, जिथे मांसाहार वर्ज्य आहे. तिथले लोकंही मांसाहार करीत नाहीत. शिवाय गावांमध्ये शेळी, कोंबडीही कोणी पाळत नाहीत, इतकंच काय मद्यपानाशीही या लोकांच्या दूरपर्यंत संबंध येत नाही. चला तर मग अशा पाच गावांबद्दल आपण आज जाणून घेऊयात... (Totally vegetarian villages in Maharashtra)

1) कनाशी
महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी संपूर्ण भारतात भ्रमण केलं. त्यांनी स्त्री-पुरुष समानता, जातीभेद निर्मुलन, प्राणीमांत्रावर दया व मानवतेचा प्रचार व प्रसार केला. पायी भ्रमण करीत चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रात आले. त्यांनी मराठी भाषेतून आपला धर्म व उपदेश केला. सत्य, अहिंसा, शांती, समता, बंधूता तसेच मानवतेची शिकवण लोकांना दिली. अनेकांच्या दुःखाचे निवारण केले. त्यांचे तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून त्यांच्या दाखल्यांचा संग्रह 'लीळा चरित्र' हे म्हाइंभटांनी लिहिले. चक्रधर स्वामी भारत भ्रमण करताना जेथे-जेथे थांबले, त्या ठिकाणांना महानुभाव संप्रदायात पवित्र मानले जाते. ते स्थान लोकांसाठी तीर्थक्षेत्र बनले. असेच एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे कनाशी.

खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात हे गाव आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने लहानसं गाव. चाळीसगाव-भडगाव मार्गावर कजगावपासून 6.1 किलोमीटर, तर भडगाव शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकात देवगिरी, कन्नड, सायगव्हाण, वाघळी मार्गाने कनाशीला आले. कनाशीला आल्यावर ते एका शेतात झाडाखाली आसनस्थ झाले. त्यांच्या भेटीसाठी दूरवरून भक्त आले होते. देव व भक्त भेटीच्या या स्थानाला चरणांकित स्थान म्हणून पवित्र मानले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com