What is a black chain how Users use this technology for marriage and politics Article
What is a black chain how Users use this technology for marriage and politics Article

काय आहे ब्लॉकचेन? लग्न, राजकारणासाठी कसे वापरले जाते हे तंत्रज्ञान

Published on

विविध प्रकारच्या नवीन आर्थिक गुंतवणूक आणि जगात घडत असलेल्या आर्थिक बाबीमध्ये रस असलेल्यांना एनएफटी आणि क्रिप्टोकरन्सी या दोन संकल्पना सातत्याने कानावर येत असतील. अनेकांनी तर यात गुंतवणूक देखील करायला सुरुवात केली आहे. या संकल्पना आता केवळ गुंतवणुकीपर्यंत मर्यादीत राहिल्या नसून त्यांचा वापर इतर अनेक बाबींसाठी देखील केला जात आहे. यात अगदी लग्न देखील समविष्ठ आहे. त्यासाठी वापर करण्यात आला तो ब्लॉकचेनचा. केवळ लग्नच नाही तर राजकारण, वस्रोद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. ब्लॉकचेनच्या माध्यमातून लग्न कसे करण्यात आले. तसेच या तंत्रज्ञानाचा देशात व आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा वापर केला जात आहे, याचा आढावा आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.

नोव्हेंबर २०२१ मध्ये पुण्यातील अनिल नरसीपुरम आणि श्रुती नायर या दांपत्याने ब्लॉकचेन लग्न केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ साठीच्या अर्थसंकल्पात डिजिटल मालमत्ता आणि त्यांचे व्यवहार यांचा उल्लेख केला. डिजिटल मालमत्तांच्या व्यवहारात प्राप्त कर्त्यावर ३० टक्के कर आकारण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय म्हणजे अप्रत्यक्षरित्या डिजिटल मालमत्तांना मान्यता देण्यासारखेच आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरमध्ये झालेले हे लग्न चर्चेत आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com