Property Disputes in india
Esakal
वारसा हक्क सिरीज | भाग १
वडिलांनी शब्द दिला होता की, पुण्याचा फ्लॅट तुझा आणि गावाची जमीन धाकट्याची... किंवा आईने स्वतःच्या हाताने सोन्याच्या पाटल्या थोरल्या मुलीला दिल्या होत्या.. पण आता लहान भाऊ कोर्टात गेलाय.. अशा अनेक केसेस तुम्हाला मराठी घराघरांत दिसत असतील. कारण फार पुर्वीपासून आपण असाच तर व्यवहार करत आलो आहोत. पण सध्याच्या काळात हा व्यवहार कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे का? अशा पद्धतीने वाटण्या केल्याने आता पुढच्या पिढीत वादाचे विषय तर होणार नाहीत ना.. असा प्रश्न निर्माण होतो आहे.
महाराष्ट्रात दिवाणी न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी तब्बल ६० ते ७० टक्के खटले हे 'वारसा हक्क' आणि वाटणीपत्राशी संबंधित आहेत.
वारसा हक्कच्या या सिरीजमधील पहिल्या भागात आपण तोंडी व्यवहाराला कायद्याच्या भाषेत कसं गृहित धरलं जातं, तोंडी व्यवहार कायदेशीर धरले जातात का, या विषयीचे कायदे काय आणि मालमत्ता विषयात काही समज गैरसमज आणि जुने खटले कसे हाताळले जातात याविषयी माहिती घेणार आहोत.