weather updates on mobile by google WeatherNext 2 AI
Esakal
पुणे - हवामानाची माहिती मोबाइलवर येणे ही तशी नवी गोष्ट नाही. मात्र दर तासाला हवामानाची माहिती मिळणं आणि तेही तुमच्या २५ ते ३० किलोमीटरच्या परिसरातली माहिती मिळणं ही गोष्ट दुर्मिळ आहे. चक्रीवादळाची माहिती याआधीही मिळत होती पण ती इतकी उशिरा मिळते की अनेकदा त्या ठिकाणांहून माणसांना हलवण्यासाठी देखील पुरेसा वेळ मिळत नाही. भूशास्त्रज्ञ सांगतील तेव्हाच एखाद्या भागात जमीन खचू शकते हे कळायचं पण आता एआयच्या मदतीने हे सगळं आधीपेक्षा अधिक वेगाने आणि अचूक कळायला मदत होणारे..
Google DeepMind आणि Google Research यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये सादर केलेल्या WeatherNext 2 मॉडेलच्या माध्यमातून या गोष्टी शक्य होणार आहेत. पण हे काम कसं करणार आहे, यातून कोणती माहिती मिळणार आहे, या विषयी अठवडाभरापुर्वी प्रसिद्ध झालेलं संशोधन काय म्हणतंय, हे टूल सामान्यांना वापरता येईल का आणि याचा कोणकोणत्या क्षेत्रासाठी उपयोग होईल हे सगळं आपण सविस्तर सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.