

India Russia 23rd Annual Summit
esakal
वास्तविक आजवर भारताने रशियाशी मुख्यत्वे लष्करी साहित्याचेच करार मोठ्या प्रमाणात केले आहेत. आर्थिक आघाडीवर रशियाशी भारताचा व्यापार नगण्य राहिला आहे. नेमकी हीच त्रुटी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या दौऱ्यात दूर करण्यात आली.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारतभेटीकडे अमेरिका, चीन व युरोपसहित अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. रशियाकडून कच्च्या तेलाची आयात बंद करा, रशियाशी संबंध तोडून टाका व अमेरिकादी गोटात सामील व्हा, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून आयातशुल्क, व्हिसा, डिपोर्टेशन यांसारख्या वेगवेगळ्या मार्गांद्वारे आकाशपाताळ एक केले आहे. तथापि, भारताकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ‘जे घडतंय ते पाहणे’ याशिवाय ट्रम्प यांच्याकडे दुसरा मार्ग दिसत नाही. जगातील चीन, उत्तर कोरिया यांसारख्या मोजक्या देशांचा अपवाद वगळता अध्यक्ष पुतीन यांना उर्वरित जगाने जवळजवळ बहिष्कृत केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुतीन यांची भारतभेट वादळी न ठरली तरच नवल!