
डॉ. मनीष दाभाडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर येऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळामध्ये भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये अनेक आमूलाग्र बदल झाले. जागतिक घडामोडींच्या कालखंडामध्ये भारताची भूमिका स्पष्ट होती. केवळ हितसंबंधांच्या रक्षणासाठी नव्हे, तर जागतिक व्यवस्थेतील भूमिका बजावण्यासाठी भारत हे सत्ताकेंद्र असेल, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या शपथविधीला नुकतीच ११ वर्षे पूर्ण झाली. या काळामध्ये जागतिक व्यवस्थेमध्ये मोठे स्थित्यंतर झाले आहे. मात्र, मोदी सत्तेवर येणे आणि हे स्थित्यंतर होणे, हा केवळ योगायोग नाही, तर भारताने या काळात योगदानही दिले आहे.