

Congress Party Division
esakal
नजीकच्या काळात काँग्रेस पक्षात मोठे विभाजन होईल, अशी शंकावजा भविष्यवाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या निकालानंतर केलेल्या भाषणात वर्तविली. ‘विकसित भारता’आधी देश ‘काँग्रेसमुक्त’ व्हावा, ही इच्छा पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वी बोलून दाखवली होतीच. आता ही भविष्यवाणी. त्यांच्या राजकीय भाष्याकडे दुर्लक्ष करणे विरोधकांना परवडणारे नसते. काँग्रेस पक्षाची सूत्रे हाती असलेले राहुल गांधी यांनी वेळीच सावध होऊन विभाजन टाळण्याच्या उपाययोजना कराव्यात म्हणून पंतप्रधान मोदी यांनी हे विधान केले आहे की, राहुल गांधींनी काहीही केले तरी ते काँग्रेसमधील मोठी फूट रोखू शकणार नाहीत, असे त्यांना म्हणायचे आहे, याचा उलगडा यथावकाश होईलच.