मुंबई : पालघरमधील 'अवेओ फार्मास्युटिकल्स' या कंपनीने बेकायदेशीरपणे अत्यंत व्यसनाधीन करणारी ओपिऑईड औषधे घाना, नायजेरिया आणि कोट डी'आयव्होर या पश्चिम आफ्रिकी देशांमध्ये निर्यात केल्याचे उघड झाले आहे. मुख्य म्हणजे भारतातून निर्यात होणाऱ्या या चुकीच्या औषधांमुळे आफ्रिकेत सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. माध्यमांनी हा प्रकार समोर आणल्यानंतर आता भारताच्या अन्न आणि औषध प्रशासनाने भारतातून होणाऱ्या औषध निर्यातीवर बंधनं आणली आहेत.
हा मुळात प्रकार काय आहे? भारतात अशा प्रकारच्या औषधांची निर्मिती कोणाकडून केली जात होती? हा सगळा प्रकार कसा समोर आला? यानंतर सरकारी आणि प्रशासकीय पातळीवर काय झाले? या सगळ्यामुळे भारताच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह कसे निर्माण झाले? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या माध्यमातून..