
नितीन जगताप
मुंबई आणि परिसरातील शहरांची लोकसंख्या बेसुमार वाढली असताना, त्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी वाढलेल्या नाहीत. त्यामुळे उपलब्ध सार्वजनिक वाहतुकीवर ताण येतो. त्यातूनच अपघात होतात आणि जीवितहानी होते. या परिस्थितीत बदल करण्यासाठी संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय मुंबईला आणल्यानंतर मुंबईचा झपाट्याने विकास होत गेला. ब्रिटिश कालखंडात, मुंबईला सर्वोत्तम शहराचा मान होता; मात्र, आजच्या वाहतूक व्यवस्थेतील समस्यांमुळे देशाच्या या आर्थिक राजधानीचे अस्तित्वच धोक्यात येत आहे.