

Purandar fort history
esakal
महाराजांचे शूर सरदार मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदर गडाच्या रक्षणासाठी दिलेरखानाविरुद्ध निकराचा लढा दिला. त्यांनी मरण पत्करले; पण ते मोगलांना शरण गेले नाहीत. अशा संघर्षमय इतिहासाने पुरंदर गड जगविख्यात झालेला आहे.
छत्रपती संभाजीराजांच्या जन्माने पावन झालेल्या पुरंदर गडाला संघर्षाचा महान वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगल सरदार मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये झालेला तह ‘पुरंदरचा तह’ नावानेच ओळखला जातो. पुरंदर हा प्राचीन किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या पहिल्या विजयी लढाईमध्ये पुरंदर गडाचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना पुरंदर हा पहिल्या विजयी लढाईचा साक्षीदार आहे.
च्या शौर्याला, धैर्याला आणि त्यागाला जगाच्या इतिहासात तोड नाही अशा छत्रपती संभाजीराजांच्या जन्माने पावन झालेल्या पुरंदर गडाला संघर्षाचा महान वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार फत्तेखानविरुद्ध झालेली लढाई पुरंदर गडाच्या सहाय्यानेच जिंकली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगल सरदार मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये झालेला तह ‘पुरंदरचा तह’ या नावानेच ओळखल जातो. महाराजांचे शूर सरदार मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदर गडाच्या रक्षणासाठी दिलेरखानाविरुद्ध निकराचा लढा दिला. त्यामध्ये ते धारातीर्थी पडले. त्यांनी मरण पत्करले; पण ते मोगलांना शरण गेले नाहीत. अशा संघर्षमय इतिहासाने पुरंदर गड जगविख्यात झालेला आहे.