Premium|Investment Planning and Strategy : गुंतवणुकीत शिस्त, सातत्य आणि वैविध्य महत्त्वाचे!

Investment Lessons and Asset Allocation : एडलवाइस म्युच्युअल फंडाच्या राधिका गुप्ता यांनी २००८ च्या मंदीत झालेल्या नुकसानाचा अनुभव सांगितला. गुंतवणुकीत विविधता, जोखीम घेण्याची क्षमता आणि आर्थिक नियोजनाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
Investment Planning and Strategy

Investment Planning and Strategy

esakal

Updated on: 

आशुतोष दाबके - dabake.ashutosh@gmail.com

गुंतवणूक ही केवळ पैसे कुठे तरी गुंतवायचे, एवढ्यापुरती मर्यादित नसते. आपल्या आर्थिक गरजा, जोखीम घेण्याची क्षमता आणि भविष्यातील उद्दिष्टे यांचा विचार करून केलेली ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. बाजारातील चढ-उतार, बदलते गुंतवणूक पर्याय आणि वाढत्या आर्थिक गरजा यांमुळे गुंतवणूकदारांसमोर अनेक प्रश्न असतात. या पार्श्वभूमीवर, एडलवाइस म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता यांच्याशी गुंतवणूक, वैयक्तिक संपत्ती आणि दीर्घकालीन संपत्तीनिर्मिती अशा विविध विषयांवर खास

‘सकाळ मनी’साठी साधलेला संवाद...

प्रश्न : तुमच्या गुंतवणुकीची सुरुवात कशी झाली? स्वतःच्या गुंतवणूक प्रवासाकडे पाहिल्यास, सुरुवातीच्या काळात झालेली सर्वांत मोठी चूक कोणती?

राधिका गुप्ता : माझ्या गुंतवणूक प्रवासातील एक महत्त्वाचा धडा म्हणजे योग्य मालमत्ता प्रकारांमध्ये वैविध्य (ॲसेट ॲलोकेशन) राखणे किती आवश्यक आहे, हे मला अनुभवातून समजलं. २००८ च्या मंदीच्या काळात माझी संपूर्ण गुंतवणूक शेअरमध्ये होती. त्यामुळे बाजारातील घसरणीचा माझ्या गुंतवणुकीच्या मूल्यावर मोठा परिणाम झाला. त्यानंतर भारतात परत येऊन व्यवसाय सुरू करताना पैशांची गरज होती. त्यामुळं शेअरमधील गुंतवणुकीचा काही हिस्सा ३० टक्के तोट्यात विकण्याची वेळही आली. माझी पुरेशी गुंतवणूक निश्चित उत्पन्न देणाऱ्या पर्यायांमध्ये (फिक्स्ड इन्कम) असती, तर शेअरमधील गुंतवणूक तोट्यात विकण्याची वेळ आली नसती. हा माझ्यासाठी मोठा धडा होता. भारतात परतल्यानंतर २०११-१२ च्या सुमारास मी ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक सुरू केली. उद्योजक असल्यामुळे सुरुवातीला उत्पन्न नियमित नसल्यानं गुंतवणूक करतानाही काही अडचणी आल्या. या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली, की गुंतवणूक करताना केवळ परताव्याकडं पाहून चालत नाही. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार मालमत्ता विभाजन कसं असावं, कुठे आणि किती गुंतवणूक करावी, याचं योग्य आर्थिक नियोजन आवश्यक आहे.

Loading content, please wait...