

Terrorism psychology
esakal
नवी दिल्लीत ‘लाल किल्ल्या’च्या जवळच झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याने देश हादरला. एखादी व्यक्ती दुसऱ्यांचा जीव घेण्याच्या इच्छेने एवढी का पछाडलेली असते की, त्यासाठी स्वतःलाही मृत्यूच्या दाढेत ढकलण्याला तयार होते, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. यामागे कोणती मानसिकता असते, याचे विवेचन.
ज्यादहशतवादी हल्ल्यात, हल्ला करणारी व्यक्ती स्वत:ला ठार करून इतरांना ठार करते, त्याला ‘आत्मघातकी दहशतवादी हल्ला’ मानले जाते. हा दहशतवादाचा भयंकर प्रकार असून, असा हल्ला थांबवणे अवघड असते. स्वत:ला मृत्यू आला तरी चालेल; पण इतरांना ठार मारण्याचे आपले ‘लक्ष्य’ गाठण्यासाठी व्यक्ती का प्रवृत्त होते, हा प्रश्न सर्वांना पडतो. स्वत:चा जीव उधळून लावून, अनेकांना ठार केले जाते. त्याची जबाबदारी खुलेआम स्वीकारली जातेसुद्धा ! संशोधनाच्या दृष्टीने विचार केल्यास यामागे अनेक धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि मानसशास्त्रीय कारणेसुद्धा आहेत.