
Raigad Fort:
esakal
रायगड हा दक्षिणेतील अभेद्य, अजिंक्य आणि महाबलवान किल्ला आहे. हा सह्याद्री पर्वतावरील दुर्गम किल्ला आहे. एतद्देशीयांच्या स्वातंत्र्याचे, स्वाभिमानाचे, निर्भीडपणाचे, विजयाचे आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. रायगड हे कोट्यवधी जनतेचे शिवतीर्थ आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अशक्य कार्य शक्य केले. शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे राज्याभिषेक करू शकतो, ही प्रेरणा हतबल झालेल्या भारतीयांच्या मनात शिवाजीराजांनी निर्माण केली. राज्याभिषेकाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. शिवराज्याभिषेक ही घटना भारतीयांच्या आद्य स्वातंत्र्याचे, स्वाभिमानाचे, सार्वभौमत्वाचे आणि अखंड विजयाचे प्रतीक आहे. असा हा राज्याभिषेक रायगडावर झाला.
रायगड हा दक्षिणेतील अभेद्य, अजिंक्य आणि महाबलवान किल्ला आहे. हा सह्याद्री पर्वतावरील दुर्गम किल्ला आहे. त्यामुळेच ग्रँट डफने रायगडाला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हटले आहे. रायगड किल्ला हा एतद्देशीयांच्या स्वातंत्र्याचे, स्वाभिमानाचे, निर्भीडपणाचे, विजयाचे आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. रायगडावरील राज्याभिषेकाने मोगल, आदिलशहा, सिद्दी, इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीजांचा अधिकृतपणे पराभव केला. आपली जनता, आपले राज्य, आपली चलन व्यवस्था, आपले कायदे, आपली संस्कृती, आपली शासन व्यवस्था, आपले सैन्य अशा स्वावलंबी आणि सार्वभौम राज्याची द्वाही शिवाजीराजांनी रायगडावरून फिरवली. रायगडावर शिवाजी महाराज ‘छत्रपती’ झाले. त्यामुळेच रायगड म्हणजे एतद्देशीयांचा आनंद आणि स्वाभिमान आहे.