Premium| Hindi Cinema: राज कपूरच्या प्रणयसंगीताची 'बरसात' कशी झाली?

Raj Kapoor's Romantic Music: 'सीमा' चित्रपटामुळे अभिनेत्री नूतनला अभिनयाचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार मिळाला. संगीतकार शंकर-जयकिशन यांनी यात रागदारी आणि लोकसंगीताचा सुंदर मिलाफ साधला.
Raj Kapoor romantic music

Raj Kapoor romantic music

esakal

Updated on

सुलभा तेरणीकर

saptrang@esakal.com

नव्या-जुन्या ताऱ्यांचे उदयास्त इथं नित्य चालतात. तरीही चित्रपटसृष्टीचे तारांगण मात्र रोजच दिवाळी साजरी करीत असते. आघाडीचे मेहबूब खान, बिमल रॉय, राज कपूर यांच्याइतकेच नौशाद, एस. डी. बर्मन, शंकर-जयकिशनसारखे संगीतकार आपली आयुधं परजून ठाकलेले दिसतात. त्यांच्या भात्यात मात्र लता, रफी यांचे बाण सज्ज असतात. ५४, ५५ या वर्षातले दिवस हेच सांगतात. त्यात ‘मनमोहना बडे झूठे’ असतं आणि प्रणयसंगीताच्या छत्रीखाली भिजणारे ‘प्यार हुआ इकरार हुआ’ असते आणि ही बरेच...

देशातल्या हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांची पहिली पावलं पडली त्यात ए. आर. कारदार हे एक प्रमुख नाव म्हणता येईल. त्यांचे दोन खंदे शिष्य म्हणजे एम. सादिक आणि एस. यू. सनी दोघांनीही वेगळ्या चुली मांडल्या; पण या दोघांनाही किंवा कारदारसह तिघांनाही संगीतकार म्हणून नौशादच हवे होते. कारण लोकप्रिय संगीत हा भारतीय चित्रपटाचा हुकमी एक्का आहे, हे सर्वांनाच उमगलं.

नौशादसाहेब आपल्या आठवणीत लिहितात, ‘जेव्हा सनी यांनी स्वतःची ‘सनी आर्टस्’ काढायचं ठरवलं तेव्हा कारदार यांनी ‘म्युझिकल पिक्चर्स’ सुरू करून मला त्यात भागीदारी देऊ केली आणि अट घातली की ‘सनी आर्टस् प्रॉडक्शन’मध्ये जाऊ नये.’ अर्थात फ्रीलान्सिंग आणि सिनेमासारख्या मुक्त कलाक्षेत्रात अशी अट मान्य होण्याचा काळ नव्हता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com