पुणे : आजवर बहिणीला नवा ड्रेस, घड्याळ, पर्स, चॉकलेट्स असं सगळं काही देऊन झालंय.. यावेळी वेगळं काय द्यावं असा मला प्रश्न पडलाय. अनेकांचं ऐकून मी वेगवेगळ्या वस्तू घेतल्या तिला त्या आवडल्या देखील तरी मला कायमच तिला 'लॉंग टर्म' मदत करेल असं काहीतरी द्यायचं आहे. पण बजेट लिमिटेड आहे त्यामुळे काय द्यावं सुचेना.. सोनं इतकं महाग झालंय की त्यात काय वस्तू येणार..? नुकताच सिव्हिल इंजिनियर झालेला प्रथमेश पांढरे सांगत होता.
तुम्हालाही तुमच्या बहिणीला जरा वेगळे पण तिला कायमस्वरूपी उपयोगी पडेल असे गिफ्ट द्यायचे आहे..? हो तुम्ही अगदी १ हजारापासून ते पाच हजारापर्यंतच्या बजेटमध्ये देखील तिच्या नावे छानशी SIP सुरू करू शकता. ही गुंतवणूक तुम्ही कोणत्या माध्यमातून आणि कशी करू शकता हे जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या विशेष लेखातून. ज्यामध्ये गिफ्टचे पाच पर्याय सुचविण्यात आले आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक आणि गिफ्टअशा दोन्ही गोष्टी साध्य होतील.