Premium| Ramayana Movie : 'रामायण’ चित्रपटाची जगभर चर्चा! हजारो कोटींच्या कमाईमागचं नेमकं गणित काय?

Ramayana vs Marvel : मार्व्हलच्या सुपरहिरोंना टक्कर देण्यासाठी भारतीय चित्रपटसृष्टी सज्ज झाली आहे! रामायणाच्या भव्य सादरीकरणातून भारतीय सिनेमाचं भविष्य कोणत्या दिशेने जात आहे?
Ramayana Movie

Ramayana Movie

esakal

Updated on: 

नव्या ‘रामायण’ चित्रपटात नुसती मनाला भावणारी कथा नाही तर व्हिज्युअल इफेक्टस् आणि भव्य-दिव्य सादरीकरणही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तो तेरा दिवसांत जगभरात हजार दीड हजार कोटींचा गल्ला जमवतो यात आश्चर्य काही नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने जगभरातील चित्रपटांच्या निर्मितीबाबत सुरू असलेल्या चर्चांबद्दल..

समाज आनंदात असला की तो दुःखी सिनेमे बघतो आणि दुःखी समाजाला भविष्यातली फॅन्टसी किंवा भूतकाळातली दिव्यता बघण्यात रस असतो. त्यामुळे दारिद्र्य, झोपड्या, दुःख याला कारमध्ये बसून फिल्म फेस्टिव्हलला येणारा प्रेक्षक लाभतो आणि उरलेल्या जनतेला तुफान हाणामाऱ्या करणारा रांगडा हिरो, स्वित्झर्लंडच्या डोंगरावर बर्फात साडी नेसून रोमान्स करणारी (पण तोही मोजका, फार नाही) गोरी हिरॉईन किंवा भूतकाळात होऊन गेलेले दिव्य पुरुष आणि भारताचा विजय असलेले (त्यातही पाकिस्तानला तोंडावर पाडून) ऐतिहासिक संदर्भाचे चित्रपट लागतात. आम्हाला चित्रपट करायला शिकवलं पण बघायला शिकवलं नाही. गाड्या घेण्याची ऐपत आहे; पण वाहतुकीचा सेन्स शिकवला नाही, तसं हे आहे. गेली अनेक वर्षं हेच सुरू आहे. ‘राजा हरिश्चंद्र’ ते ‘रामायण’ हाच इतिहास आहे. त्याला अपवाद नाही.

Loading content, please wait...