

Ramsej Fort
esakal
नाशिकपासून जवळ असलेला रामशेज किल्ला मराठ्यांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या उत्तम युद्ध नियोजनाचे तो उदाहरण आहे... शिवस्वराज्याचा मानबिंदू आहे. अत्यल्प साधनांच्या मदतीने बलाढ्य शत्रूविरुद्ध कसे लढायचे, याचे प्रेरणास्थान म्हणजे रामशेज किल्ला. सह्याद्री रांगांतील दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. लाखोंच्या संख्येने आलेल्या मोगल सैन्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी धैर्याच्या, शौर्याच्या, चातुर्याच्या आणि सह्याद्रीच्या मदतीने पराभूत केले. त्यांनी बुद्धिचातुर्याने भौगोलिक परिस्थितीचा लोककल्याणासाठी उपयोग करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटले, की आपण सहजच त्यांचे स्वराज्य जिंकून घेऊ.