

Rangna Fort : The Abode of History
esakal
रांगणा किल्ला घनदाट जंगलात आहे. सह्याद्रीच्या रांगांतील दुर्गम किल्ला आहे. कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारा अजिंक्य किल्ला आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे २,९०० फूट आहे.
रांगणा किल्ल्याचा अभेद्य आणि विस्तीर्ण आकार पाहता त्याचा रांगडेपणा स्पष्ट दिसतो. राजा भोज, संगमेश्वरचा राजा जखुदेवराय, बहामणी, आदिलशहा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा रांगणा हा साक्षीदार आहे. प्राचीन काळापासूनच रांगणा एक महत्त्वाचे सत्ताकेंद्र होते. नयनरम्य असा रांगणा किल्ला आपल्याला शिवचरित्राची साक्ष देतो.
दक्षिण कोकण, गोवा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथा या भागावर वचक ठेवणारा मध्ययुगीन काळातील महत्त्वाचा किल्ला म्हणजे रांगणा होय. त्याचा अभेद्य आणि विस्तीर्ण आकार पाहता त्याचा रांगडेपणा स्पष्ट दिसतो. राजा भोज, संगमेश्वरचा राजा जखुदेवराय, बहामणी, आदिलशहा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संघर्षाचा रांगणा हा साक्षीदार आहे. रांगणा किल्ला प्रसिद्ध असल्यामुळे त्याला ‘प्रसिद्धगड’ असेही म्हटले जाते. सह्याद्रीच्या रांगेतील, मुख्य रांगेपासून थोडासा अलग झालेला; परंतु एका सोंडेने सह्याद्री रांगेशी जोडलेला हा महाकाय किल्ला आहे. याचे बांधकाम बाराव्या शतकात शिलाहार राजा भोज (दुसरा) याने केले. तो मोठा दूरदृष्टीचा आणि कल्पक राजा होता. त्याने अनेक किल्ले बांधले. त्यांपैकी रांगणा हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. प्राचीन काळापासूनच रांगणा हे महत्त्वाचे सत्ताकेंद्र होते. संगमेश्वराचा राजा जखुदेवराय याचे १५व्या शतकात रांगणावर वर्चस्व होते. इ. स. १४७०मध्ये बहामणी वजीर महम्मद गवाने याने जखुदेवराय यांच्याकडून रांगणा दगाबाजीने ताब्यात घेतला. त्यासाठी त्याला दोन वेळा रांगण्यावर मोहीम काढावी लागली. तो म्हणतो की रांगणा घेण्यासाठी मर्दुमकीबरोबरच संपत्तीही खर्च करावी लागली. बहामणीच्या पतनानंतर रांगणा आदिलशहाच्या ताब्यात आला. यावेळेस रांगण्याचा कारभार सावंत पाहात होते.