

Urbanization in India
esakal
येत्या काळात ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर प्रचंड प्रमाणात होणार आहे. साहजिकच सर्वसमावेशकता असलेली शहरंच टिकतील...नवी शहरं उदयास येतील; परंतु त्यावर पुढील २५ वर्षांत आपण नक्की काय करणार आहोत, याबद्दल फारशी स्पष्टता दिसत नाही. मोठ्या आणि नव्या शहरांच्या निर्मितीसाठी आता ‘आऊट ऑफ द बॉक्स’ योजना राबवायला हव्यात.
अठराव्या शतकात जगाच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त पाच टक्के नागरिक शहरात राहायचे. एकोणिसाव्या शतकात तो आकडा १६ टक्क्यांच्या आसपास गेला. आता एकविसाव्या शतकात तब्बल ५६ टक्के नागरिक शहरात राहत आहेत. येत्या काही वर्षांत तो आकडा यापेक्षाही अतिप्रचंड वेगाने वाढेल.