
तुम्ही कधी सोन्यावर कर्ज घेण्याचा विचार केला आहे का? किंवा तुमच्या घरात पडलेल्या सोन्यातून तातडीने पैसे उभे करण्याची वेळ आली आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे!
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सोन्यावर कर्ज देण्याबाबत काही नवे आणि मोठे बदल करणारे नियम आणले आहेत. हल्लीच जाहीर झालेल्या या नियमांमुळे, आता सोने गहाण ठेवून कर्ज घेणं तुमच्यासाठी कसं वेगळं असेल? यात काय बदल होणार आहेत? आणि यामागे RBI चा नेमका उद्देश काय? हे सगळं आपण ‘सकाळ प्लस’च्या या लेखातून समजून घेणार आहोत...