
चेंगराचेंगरी, गर्दी काही भारतीयांसाठी नवीन नाही. त्यात जीव जाणंही आपण पाहिलेलं आहे. पण नेहमी प्रश्न पडतो ते गर्दीतली माणसं अशी का वागतात? बाकीच्यावेळी शहाणीसुरती भासणारी माणसं गर्दीत गेल्यावर आपलं नियंत्रण हरवून का बसतात?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हजारो चाहते जमले होते. पण काहीच वेळात हा आनंदसोहळा एका दु:खद घटनेत बदलला. स्टेडिअमच्या एका गेटवर मोफत तिकीटं दिली जात असल्याची अफवा पसरली आणि लोक सैरावैरा धावत सुटले. त्यात प्रचंड चेंगराचेंगरी झाली, ११ जणांचा मृत्यू झाला आणि किमान ५०जण जखमी झाले.
नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी असेल नाहीतर मग हाथरसच्या सत्संगातील चेंगराचेंगरी असेल कित्येक भारतीय अशा घटनांत मृत्यूमुखी पडले आहेत. केवळ आध्यात्मिक घटना नव्हेत तर एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पूलावरही अशाच प्रकारची चेंगराचेंगरी होऊन भर दिवसा जवळपास २३ लोक मरण पावले होते.
एखाद्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली की किमान १५-२० लोकं मृत्यूमुखी पडणं आणि त्यापेक्षा कितीतरी जास्त लोकं जखमी होणं हे सुद्धा नेहमीचंच.
दिल्लीत तर रेल्वे स्टेशनवरील एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाताना चेंगराचेंगरी झाली आणि जीवितहानी झाली.
पण मुळात असं का होतं? लोकांची मानसिकता ही का असते? गर्दीत गेल्यावर नेमकं काय बदलतं??? गर्दीच्या घटना या गेल्या काही वर्षांत प्रकर्षाने समोर येतायत की पूर्वीही होत्या? असे कित्येक प्रश्न पडतात.. त्याच्याच उत्तरांसाठी वाचा, सकाळ प्लसचा हा लेख.