

Reading benefits children
esakal
वाचनाचं आणखी एक महत्त्वाचं-फायद्याचं अंग म्हणजे ९ ते १३ वयोगटातल्या मुलांमध्ये नैतिकता आणि जबाबदारीची जाणीव विकसित होते. या वयोगटातील प्रत्येक क्षण म्हणजे मुलांची विचारसरणी, मूल्यं आणि आत्मविश्वास घडवणारा महत्त्वाचा टप्पा आहे.
वय ९ ते १३ म्हणजे बालपणातून किशोरवयाकडे जाण्याचा सुंदर आणि बदलांनी भरलेला काळ. संशोधकांच्या मते ९ ते १३ वर्षे वयाच्या काळात, मुलांच्या मेंदूमध्ये झपाट्याने बदल होतात. त्यांची विचारशक्ती परिपक्व होते. समाजाकडून मिळणारं कौतुक आणि प्रतिसाद याबद्दलची संवदनशीलता वाढते.