

France political instability
esakal
प्रा. अविनाश कोल्हे
कोणत्याच देशात दंगलीचे, सामाजिक अशांततेचे दिवस फार काळ टिकत नाहीत. लवकरच फ्रान्स पूर्वपदावर येईल. मात्र या घटनेमुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे आणि ती म्हणजे पाश्चात्य देशांनी अनेक बाबींचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.
ने पाळमध्ये मागच्या आठवडयात एवढ्या वेगात राजकीय उलथापालथी झाल्या की, जगातील इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष गेले नाही. अशीच एक महत्त्वाची घडामोड म्हणजे फ्रान्समध्ये निर्माण झालेली अस्थिरता. मागच्या आठवडयात फ्रेंच जनतेच्या मनातील असंतोष बाहेर आला.