MGNREGA to G Ram G
Esakal
पुणे - महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्पॉयमेंट गॅरंटी स्किम ही बेरोजगारांना कामाची हमी देणारी योजना ग्रामीण भागात चांगलीच लोकप्रिय झाली आहे. मात्र आता या योजनेचे नाव बदलण्यावरून मोठा वाद सुरू झाला आहे. मूळ कॉग्रेसच्या राज्यात सुरू झालेल्या या योजनेला महात्मा गांधी यांचे नाव दिले आहे. मात्र आता याचे स्वरूप आणि नाव बदलाचा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. यावर प्रियांका गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षाने या विरोधात संसदभवन परिसरात आंदोलन केले आहे. योजनेचे नाव बदलल्याने गांधीजींची दुसऱ्यांदा हत्या होत आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे.
कोणतही नवं सरकार आलं की अनेक चांगल्या जुन्या आणि लोकप्रिय योजनांचे श्रेय घेण्यावरून चढाओढ सुरू होते. कॉग्रे्सच्या काळात सुरू झालेल्या अनेक योजनांमध्ये बदल करत, त्यांना नवी नावे देत त्याचे रिब्रॅन्डिंग भाजपकडून केले जाते आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये नेमक्या कोणत्या योजनांची नावे बदलली गेली, त्याचे स्वरूप कसे बदलले हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.