
Indian secularism
esakal
प्रियदर्शन
‘जावेद अख्तर काफिर आहेत,’ ही भाषा आहे ‘जमीयत उलेमा ए हिंद’ची. त्यांची तक्रार आहे की अख्तर यांनी अल्लाच्या सन्मानाला धक्का दिला आहे. ‘जमीयत उलेमा ए हिंद’च्या या मतावर आश्चर्य किंवा दुःख व्यक्त करण्याची गरज नाही.
दुःखाची गोष्ट ही आहे, की या मतप्रदर्शनानंतर, या संघटनेच्या दबावाखाली पश्चिम बंगाल उर्दू अकादमीने सिनेमामधील उर्दूच्या योगदानावर होणारा चार दिवसांचा कार्यक्रम रद्द केला, कारण जावेद अख्तर हे त्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. ही एका लोकशाही सरकारच्या अधिपत्याखालच्या संस्थेची कट्टरतावाद्यासमोरची शरणागाती होती आणि त्याहूनही वेदनादायक म्हणजे, ज्या संस्थेने गुडघे टेकले, तिच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आहेत, ज्या लढाऊ नेत्या म्हणून ओळखल्या जातात.