
Shivaji Maharaj
esakal
केदार फाळके
editor@esakal.com
तत्कालीन परिस्थिती पाहता, शिवाजी महाराजांचे राज्य हिंदूंस पोषक होते, हे निश्चित आहे. तसेच, काही प्रकरणांमध्ये त्यांनी मुस्लिम सत्ताधाऱ्यांनी उद्ध्वस्त केलेली किंवा मशिदीत रूपांतरित केलेली मंदिरे पुन्हा मूळ स्वरूपात आणली. तथापि, यावरून त्यांनी असे कार्य नियमितपणे केले असे नाही.
स्वराज्याच्या स्वरूपाचा अभ्यास करताना, अशा एक-दोन घटना न पाहता शिवाजी महाराजांच्या धार्मिक सहिष्णुतेला प्राधान्य द्यावयास हवे. शिवाजी महाराज कट्टर धार्मिक नव्हते आणि त्यांचे राज्य, जरी हिंदू धर्माला आधार देणारे होते, तरी ते धर्मसत्ताक राज्य (theocracy) नव्हते.