Premium|Retirement Planning: मला वयाच्या ५५ व्या वर्षी निवृत्ती घ्यायचीय; मी वयाच्या ४५ व्या वर्षापासून पैश्याचे नियोजन कसे करू..?

How to start Investment: वयाच्या ६० वर्षांपर्यंत नोकरी करेन' अशा विचाराने निवृत्तीचे नियोजन करू नका, कारण '४५ हे नवीन व्याख्येत ६०' आहे; काय सांगतायेत चार्टर्ड अकाउंटंट..?
Retirement Planning at middle age
Retirement Planning at middle ageEsakal
Updated on

Retirement Planning at Middle Age : वयाच्या ४५ व्या वर्षात येऊन असा प्रश्न पडणे म्हणजे थोडं वेगळंच वाटू शकतं.. पण खूपदा आपल्याला गुंतवणुकीचं भान यायला आणि त्यातून नियोजनपुर्वक गुंतवणूक करायला वेळ लागतो. ज्यावेळी खरं तर माणसाच्या सगळ्या गरजा पूर्ण होऊन माणूस सेटल झालेला असतो त्यावेळी म्हातारपणाची चिंता सतावू लागते. वयाच्या या टप्प्यावर येऊनसुद्धा योग्य प्रकारे नियोजन केल्यास निवृत्तीसाठी तुम्हाला योग्य प्रकारे काम करता येते.

चाळीशीत असणारा वैभव नायकोडे म्हणाला, मी वयाच्या १८ व्या वर्षापासूनच कामाला सुरूवात केली. सुरूवातीच्या काळात मला खूपच कमी पगार होता. माझ्या स्वत:च्या गरजा जेमतेम भागायच्या. हळूहळू पगार वाढत होता, पण माझ्यावर खूप जबाबदार्या देखील होत्या. बहिणीचं लग्न आणि स्वत:चं छोटंसं घर हे माझे प्राधान्यक्रम होते. ते झाल्यानंतर घराचं कर्ज आता संपत आल्यानंतर मला आता माझ्या म्हातारपणाचेही नियोजन करावे लागणार याचे भान आले आहे. दरम्यान मुलं, शिक्षणं, राहणीमान यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होतो आहे. पण तरीही पुढच्या दहा वर्षात मला किमान माझी पुढची तीस वर्ष मला आरामात जगता येतील असे नियोजन करायचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com