Premium|Revised National Pension Scheme Maharashtra : सुधारित राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजना नेमकी कशी आहे?

RNPS Maharashtra Government Employees : महाराष्ट्र सरकारच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजनेत २० वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता देण्याची तरतूद आहे.
Revised National Pension Scheme Maharashtra

Revised National Pension Scheme Maharashtra

esakal

Updated on

प्रश्‍न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे!

‘सकाळ मनी’च्या दर महिन्याच्या अंकात शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँकिंग, टॅक्सेशन, रिअल इस्टेट, सोने-चांदी, क्रिप्टो करन्सी, आर्थिक नियोजन, निवृत्ती नियोजन आदी विविध विषयांवर तज्ज्ञांचे लेख, मुलाखती प्रसिद्ध होत असतात. त्या पार्श्वभूमीवर आता वाचक वा गुंतवणूकदारांच्या मनातील प्रश्नांना तज्ज्ञांकडून उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘सकाळ मनी’कडे आलेल्या निवडक प्रश्नांची उत्तरे पुढील अंकांमध्ये प्रसिद्ध केली जातील. यासंदर्भात वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. वाचकांनी आपले प्रश्न

या मेल आयडीवर थोडक्यात पाठवावेत. आपले प्रश्न संक्षिप्त आणि प्रातिनिधिक स्वरूपात असावेत.

प्रश्न १ : महाराष्ट्र सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजना (आरएनपीएस) नेमकी काय आहे?

उत्तर ः या सुधारित पेन्शन योजनेनुसार, ज्या कर्मचाऱ्यांची २० वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण झाली आहे, त्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या (मूळ वेतन + महागाई भत्ता) ५० टक्के पेन्शन, तसेच त्यावर लागू होणारा महागाई भत्ता (डीए) देण्याची हमी महाराष्ट्र सरकारने दिली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या युनिफाइड पेन्शन स्कीमच्या (यूपीएस) धर्तीवर आधारित असली, तरी ती तंतोतंत त्याच स्वरूपाची नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com