

bihar women voter turnout
esakal
संजय कुमार
बिहारमधील मागील काही विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या आकडेवारीनुसार महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांच्या तुलनेत अधिक होता. त्याचप्रमाणे बिहार विधानसभेत निवडून आलेल्या महिलांची संख्या पाहता, सध्याच्या विधानसभेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढून ११ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यावरून स्पष्ट होते, की बिहारच्या राजकारणात महिला मतदार हा आता केवळ ‘महिला कल्याण योजनांचे लाभार्थी’ नसून राजकीय समीकरण ठरविणारे शक्तिशाली घटक बनल्या आहेत.
बिहारमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणदुंदुभी वाजू लागल्या आहेत. बहुतांश राजकीय पक्ष सध्या सत्तेत आल्यानंतर महिलांच्या कल्याणासाठी कोणत्या योजना राबविणार याची आश्वासने देण्यात व्यग्र आहेत तर सत्ताधारी पक्ष स्वतःच्या महिला केंद्रित त्यांच्या कल्याणाच्या योजना जाहीर करण्यात मग्न आहे.