
जम्मू-काश्मीरला गेल्या ३५ वर्षांत अनेकदा भेट दिली. एका बाजूला दहशतवादाने हे राज्य उद्ध्वस्त झाले असताना त्यापेक्षाही मोठा धोका उभा राहिलाय तो म्हणजे तापमानवाढीमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाचा. याची जाणीव यंदाच्या काश्मीर भेटीत तीव्रतेने झाली.
यंदा १९ जूनला कारगिलमध्ये ११ हजार फूट उंचीवर भारतीय लष्कराच्या सहकार्याने होणार्या सरहद शौर्यथॉन या मॅरेथॉनसाठी मी पुण्यातून श्रीनगरला पोहोचलो. श्रीनगरला पुण्या-मुंबई सारखे ऊन पडले होते. बहुदा हा दिवस काही वर्षांमधला सर्वोच्च तापमानाचा असावा असे काहीजणांचे मत होते. रस्त्यावर फिरताना अंगातून घामाच्या धारा निघू लागल्या.
पूर्वी जम्मूहून काश्मीरला जाताना जम्मूला अंगाची लाही लाही होत असे, तर नेहरू बोगदा ओलांडल्यावर काश्मीरमध्ये प्रवेश करताच हवेमध्ये अत्यंत सुखद असा गारवा असे. यंदाची उष्णता गेल्या ३५ वर्षांतील माझ्यासाठीचा पहिला अनुभव होता. सामान्यपणे आपण उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जावे म्हणून काश्मीरची निवड करतो. पण हे उलटेच होताना दिसत होते. काश्मीरहून कारगिलकडे जात असताना जोझीला घाट सुरू होईपर्यंत मला आपण पुण्यातील थंडीतून गरम हवेच्या ठिकाणी आलो की काय असा भास होत होता तर जसजसे आम्ही द्रासकडे जाऊ लागलो, तसतसे तापमान कमी होऊन थंडी वाजू लागली. द्रास म्हणजे जगातील एक महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण मानले जाते. येथील तापमान कधीकधी उणे साठपर्यंत जाते. काश्मीरमध्ये उष्माघाताचा त्रास