Rohan murthy Soroco
Esakal
पुणे - मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी काहीच दिवसांपूर्वी आर्टीफिशियल इंटेलिजन्स कंपन्यांविषयी एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सध्या प्रत्येकच कंपनी ‘एआय’ साठी फंडिंग करते आहे. एआय कंपन्यांना त्या माध्यामातून फंड रेजिंगदेखील करणे शक्य होते आहे. पण एआय डेटा सेंटर्ससाठी लागणारी ऊर्जा, पाण्याचा वापर आणि खर्च पाहता भविष्यात हे फार काळ टिकू शकेलच असे नाही. ज्या कंपन्या माहितीपेक्षाही वेगळं काही देण्याचा प्रयत्न करतील त्याच आणि काही मोठ्या कंपन्या दीर्घ काळासाठी काम करू शकतील.
आर्टिफिशियल क्षेत्रात जगात कमालीची स्पर्धा सुरू असताना आपले वेगळेपण जपणारी रोहन मूर्ती यांची ‘सोरोको’ ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील एआय कंपनी काहीतरी वेगळं करू पाहते आहे. या कंपनीच्या नावावर सध्या ४० पेटंट असून एव्हरेस्ट ग्रुपने २०२५ च्या अहवालात सोरोकोला 'डिजिटल इंटरॅक्शन इंटेलिजन्स' मध्ये सलग दुसऱ्यांदा जागतिक लीडर म्हणून घोषित केले आहे.
इंन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि समाजसेविका, लेखिका सुधा मूर्ती यांचा मुलगा म्हणून रोहन यांची ओळख आहेच. मात्र त्या पलिकडे जाऊन ‘सोरोको’ च्या कामाने आता जगाला रोहन मूर्ती यांची ओळख झाली आहे. या लेखाच्या माध्यामातून ‘सोरोको’ कंपनी नेमके ‘एआय’ मध्ये काय काम करते, त्यांची कामाची पद्धत काय, त्याच्या मागे त्यांचा विचार काय, या कंपनीचे जागतिक स्थान काय, रोहन यांचे शिक्षण अशा सर्व गोष्टींची माहिती सकाळ+ च्या या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया.