
Governor's role
esakal
अभिजित मोदे
भारतातील विविध राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांत राज्यपालांच्या भूमिकेबाबत वाद आणि चर्चा वाढल्या आहेत. तामिळनाडू , बंगाल आणि महाराष्ट्रसारख्या राज्यांमध्ये राजकीय तणावांचा केंद्रबिंदू राज्यपाल ठरले आहेत. काही राज्यपालांवर केंद्राच्या इच्छेनुसार वागण्याचा आरोप झाला आहे.
तर काही ठिकाणी निवडून आलेल्या सरकारांवर राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकारांचा वापर करून दबाव आणल्याचा वाद उभा राहिला आहे. यामुळे भारतीय संघराज्य व्यवस्थेतील प्रश्न समोर आले आहेत. अशा पार्श्वभूमीवर राज्यपालांची भूमिका संविधानिक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयीन निर्णय आणि आयोगांच्या शिफारशीच्या आधारे समजून घेणे गरजेचे आहे.