
सुनील चावके
आणीबाणीच्या मुद्यावरून राहुल गांधींचा पवित्रा नेहमीच बचावात्मक राहिला आहे. पण राज्यघटनेतून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे दोन शब्द वगळण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या मागणीवरून विरोधकांना पुन्हा कोलित मिळाले आहे. ‘राज्यघटना’ संकटात आल्याचा मुद्दा ते पुन्हा पुढे आणण्याची शक्यता आहे.
दरवर्षी २५ जूनच्या आसपास राजकीय वर्तुळात आणीबाणीच्या त्या १९ महिन्यांच्या काळ्या पर्वाची उजळणी होत असते. दरवर्षी जून महिन्याच्या अंतिम आठवड्यात या मुद्यावरून काँग्रेस पक्ष बॅकफूटवर जातो. अर्थात, गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसजनांनाही ‘त्या’ आणीबाणीची तुलना सध्याच्या कथित ‘अघोषित आणीबाणी’शी करून सत्ताधारी भाजपवर आरोप करण्याची संधी मिळाली आहे.