
राज्यातील महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे मार्गी लागावीत यासाठी १९९३ मध्ये राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. आयोगाच्या आठव्या अध्यक्ष म्हणून रूपाली चाकणकर यांची २० ऑक्टोबर २०२१ मध्ये नियुक्ती झाली. पहिल्या तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्या पुन्हा अध्यक्ष बनल्या.
चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षही आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या व हुंडाबळी प्रकरणात वेळेत कारवाई न केल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. पूर्णवेळ अध्यक्ष हवा यांसह आयोगाच्या एकूणच कामकाजावरही टीका झाली. या संदर्भात रूपाली चाकणकर यांच्याशी सरकारनामाच्या प्रतिनिधी श्रद्धा चमके यांनी केलेली बातचीत.