India Russia Labor Mobility Pact
esakal
Premium|India Russia Labor Mobility Pact : चीनला 'चेकमेट'! रशियाच्या सैबेरियात आता भारतीयांचा डंका; पुतीन यांच्या दौऱ्यात मोठा करार
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यामध्ये कामगारांची अवैध वाहतूक रोखणे आणि भारतीय कामगारांचा रशियातील प्रवेश सुकर करणे या विषयावर दोन करार झाले. रशियाला भविष्यामध्ये मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्याबरोबरच सैबेरियासारख्या भागामध्ये चिनी नागरिकांची संख्या वाढत आहे. तसेच, चिनी नागरिकांची घुसखोरीही होत आहे. त्यातून चीनचा वाढता प्रभाव रशियाला नको असून, रशियाला चीनपेक्षा भारत हा जास्त विश्वासू मित्र वाटतो.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या नुकत्याच पार पडलेल्या भारत दौऱ्यात झालेल्या महत्त्वाच्या करारांमध्ये कामगार क्षेत्राविषयीच्या दोन करारांचा समावेश आहे. भारतातून रशियात कामगारांची अवैध वाहतूक रोखणे आणि भारतीय कामगारांचा रशियातील प्रवेश सुकर करणे, असा त्यांचा हेतू आहे. त्याद्वारे भारतीय कुशल कामगारांसाठी भविष्यात रशियात नवीन संधींचे दालन खुले होणार आहे. भारत आणि रशिया यांना तर त्याचा फायदा होईलच, पण त्या माध्यमातून चीनच्या रशियातील घुसखोरीला आळा घालण्यासही मदत होऊ शकते.

