Saadat Hasan Manto: मंटोंची निर्भीड लेखणी आणि अद्वितीय शैली

सआदत हसन मंटोंनी आठ दशकांपूर्वी लिहिलेल्या कथा आजही जिवंत वाटतात. त्यांच्या निर्भीड लेखनशैलीने समाजातील वास्तवाला शब्दरूप दिलं.
Saadat Hasan Manto
Saadat Hasan Mantoesakal
Updated on
‘प्रत्येक स्त्री वेश्या नसते; पण प्रत्येक वेश्या एक स्त्री असते’ हे सांगण्याचं धाडस करणाऱ्या मंटोंसाठी मानव शरीर म्हणजे मानवी अनुभवाला ओळखण्याचं व समजण्याचं अत्यंत विश्वासू अन् महत्त्वपूर्ण साधन आहे. मग ते मानव शरीर वेश्या, कुलीन स्त्री, अपराधी किंवा निष्पाप माणसाचंही असू शकतं. ‘शरीररूपी प्रतीकात्मक जंगलातील काळोखात सगळे रस्ते हरवून जातात’, असं मंटो म्हणतात; पण त्यांना मात्र या काळोखाची भीती वाटत नाही.

स्मरण

डॉ. सुलभा कोरे

kore.sulabha@gmail.com

सआदत हसन मंटोंनी जे ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वी लिहिलं त्यातलं वास्तव आजही जिवंत आणि एकत्र झालेलं दिसतं. हीच मंटोंची ‘मंटोगिरी’ आहे. याच ‘मंटोगिरी’मुळे मंटो आजही त्यांच्या साहित्याच्या रूपात जिवंत आहेत. सत्य तेवढ्याच निर्भीडपणे मांडणारा एक कथाकार, कवी, नाटककार आणि लेखक असलेल्या मंटोंचा आज स्मृतिदिन.

त्यानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाचे स्मरण...

सध्या समाजातील ज्या स्थितीत आपल्या जीवनाची वाटचाल सुरू आहे, ती जर तुम्हाला कळत नसेल तर माझ्या कथा वाचा. त्या जर तुम्ही सहन करू शकला नाहीत तर खुशाल समजा, की हे जग सहन करण्याच्या पलीकडचं आहे. मला शिष्टाचाराचे किंवा समाजाचे कपडे उतरविण्याची गरजच नाही; कारण तो नग्नच आहे.

त्याला कपडे चढविण्याचं काम माझं नाही. लोक मला ‘काळा शाईवाला’ समजतात; पण मी काळ्या पाटीवर सफेद खडूने लिहितो, काळ्या खडूने नाही. त्यामुळे सारं काही स्पष्ट दिसतं आणि हेच माझं वैशिष्ट्य आणि खास शैली आहे.

लोकांनी मला नावं ठेवली, माझा धिक्कार केला,’ हे स्वतःबद्दल सांगणारा, समाजाबद्दल आणि आपल्या लेखनाबद्दल असं बेधडक, उघडं-वाघड आणि तेवढंच खरं खरं बोलणारा हाच तो सआदत हसन मंटो नावाचा किरकोळ, फाटक्या अंगाचा आणि कुठेही कसंही राहणारा, आपली मनमानी करणारा, करतानाही नेहमीच सत्य आणि रोखठोक तेवढ्याच निर्भीडपणे आणि ते निर्भीकपणे मांडणारा एक अफसाना निगार (कथाकार) कवी, नाटककार, लेखक आणि सिनेमावालाही. मंटोंच्या बाबतीत अनेक चांगल्या-वाईट गोष्टी सांगितल्या जातात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com