
Saif Ali Khan Enemy Property Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे. सैफवर मुंबईतील राहत्या घरी झालेल्या हल्ल्यानंतर आणखी एक कारण ज्याने अभिनेत्याला चर्चेत ठेवले आहे. सैफ अली खान हा भारताचे महान फलंदाज मन्सूर अली खान पतौडी यांचा मुलगा. मन्सूर अली खान हे भोपाळमधील राजघराण्यातील आहेत आणि त्यामुळेच सैफ चर्चेत आला आहे.
केंद्र सरकारने भोपाळ येथील पतौडी कुटुंबाची १५ हजार कोटी रुपयांची संपत्ती ही 'enemy property' म्हणून जाहीर केली आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अभिनेता सैफ अली खानला केंद्र सरकारच्या आदेशाविरुद्ध अपील प्राधिकरणाकडे जाण्यास सांगितले आहे. सैफने बालपण घालवलेले फ्लॅग स्टाफ हाऊस, लक्झरी हॉटेल नूर-उस-सबाह पॅलेस, दार-उस-सलाम, हबीबीचा बंगला, अहमदाबाद पॅलेस आणि कोहेफिजा यांचा या मालमत्तेत समावेश आहे. आता ही 'enemy property' म्हणजे काय? त्याच्या पूर्वजांच्या संपत्तीवर केंद्र सरकार हा हक्क सांगतेय? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.