
Samruddhi Highway Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या म्हणजे ५ जूनला नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवेच्या, म्हणजेच 'समृद्धी महामार्गा'च्या शेवटच्या ७६ किमीच्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत. नाशिकमधील इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे यांना जोडणारा हा टप्पा आहे.
'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' हे फडणवीसांचं स्वप्न होता आणि ते स्वप्न अखेर सत्यात उतरत आहे. या महामार्गात किती गावं जोडली जातात, किती जिल्ह्यांतून तो जातो, किती निधी त्यासाठी वापरला आहे यासोबत समृद्धी महामार्गावरील अपघात आणि दुर्घटनांचासुद्धा आढावा या लेखातून घेतला आहे.