Premium|Japan Liberal Democratic Party election results : परिवर्तनाचा जपानी जनादेश!

Japan-India strategic partnership : जपानमध्ये सानाए ताकाइची यांच्या ऐतिहासिक विजयामुळे हिंद-प्रशांत क्षेत्रातील लष्करी समीकरणे बदलणार असून, चीनच्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी आणि भारतासोबतची धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी जपान आता आक्रमक भूमिका घेण्यास सज्ज झाला आहे.
Japan Liberal Democratic Party election results

Japan Liberal Democratic Party election results

esakal

Updated on

डॉ. अमिताभ सिंग - samitabh@gmail.com

जपानमधील निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या सानाए ताकाइची यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. ताकाइची यांच्या प्रचंड बहुमतामुळे जपानची भूमिका आता फक्त एक शांततापूर्ण राष्ट्र अशा दृष्टिकोनातून बदलून हिंद-प्रशांत क्षेत्रातील महत्त्वाचा देश अशी होईल. त्यामुळे चीनवरही मोठेच दडपण येईल आणि भारताच्या सामर्थ्यालाही अधिक पाठबळ मिळेल.

जपानच्या कनिष्ठ सभागृहात सानाए ताकाइची यांच्या दणदणीत विजयाने त्यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाला (एलडीपी) दोनतृतीयांश असे प्रचंड बहुमत मिळाले. संबंधित घटना जपानी राजकारणातील भूकंपसदृश बदल असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे हिंद-प्रशांत क्षेत्रातील वर्चस्वाची गणितेही बदलणार आहेत. महायुद्धानंतरच्या जपानमध्ये असा निकाल म्हणजे सर्वात स्पष्ट आणि सक्षम असा कौल आहे. त्याद्वारे जपानने आक्रमक दृष्टिकोनाला पाठबळ दिले आहे. त्यानुसार संरक्षण खर्चात वाढ करावी, असेही जनतेचे म्हणणे आहे. सध्या केवळ स्वसंरक्षणात्मक बळ वापरणारा जपान हा लष्करीदृष्ट्या आक्रमक व्हावा, यासाठी घटनात्मक फेरबदल करून चीनच्या आक्रमणाला तसेच प्रत्युत्तर द्यावे, असा दृष्टिकोन त्यात आहे. हा निकाल म्हणजे चीनच्या आर्थिक धाकदपटशाला मतदारांनी नाकारले असल्याचाही अर्थ लावला जात आहे. तसेच या निकालामुळे जपान हा फक्त अमेरिकेचा एक सहकारी या नात्यापेक्षा, एक जागरूक सुरक्षा रक्षक म्हणून पुढे आला आहे. जागतिक व्यासपीठावर पाहता अनेक देशांच्या या संदर्भातील प्रतिक्रिया या, जपान, चीन आणि अमेरिका यांच्याशी असलेल्या त्यांच्या परस्पर संबंधानुसार भिन्न भिन्न आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com