
मैत्रेयी पंडित-दांडेकर
आमच्या कंपूतील बहुतांश मेंबर्स चेऱ्या, फेऱ्या आणि कॅमेऱ्याच्या मागे सैरभैर असताना शेवटचा गडी मात्र शेताबाहेरच्या मोऱ्या बघून भारावून गेला होता. सर्वसामान्य लोकांना जसं ठिकठिकाणची पर्यटन स्थळं, प्रसिद्ध हॉटेलं, दुकानांना भेटी द्यायला आवडतं तसं आमच्या नीवूला जाईल तिथल्या शौचालयांना भेट द्यायला आणि प्रातःविधीतील परावलंबनामुळे सोबत बाबाला घेऊन जायला प्रचंड आवडतं.