
डॉ. द. दि. पुंडे
‘थेंब’ ही शब्दप्रतिमा या संग्रहात कितीतरी वेळा आली आहे, पण गवसलेल्या एकाच शब्दप्रतिमेचा निरनिराळ्या भावानुभवांच्या दर्शनासाठी उपयोग करण्याची शक्ती कवयित्रीकडे आहे. मनाला भिडणाऱ्या, अंतर्मुख करणाऱ्या, चिंतनशील कवितांचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी तळ्यातले आकाश हा काव्यसंग्रह जरूर आपल्या संग्रही ठेवावा.