Premium|Hantavirus Symptoms and Spread : कोरोनानंतर आता 'हंटा विषाणू'चे सावट? अंटार्क्टिका क्रूझवरील मृत्यूनंतर जागतिक आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर

New Infectious Disease Threat : उंदीर-घुशींमार्फत पसरणाऱ्या हंटा विषाणूचा अंटार्क्टिका क्रूझवरून प्रवास, डच दांपत्याच्या मृत्यूनंतर विमानातील प्रवाशांचा शोध सुरू असून जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला हा इशारा संपूर्ण जगाला सतर्क करणारा ठरत आहे.
Hantavirus Symptoms and Spread

Hantavirus Symptoms and Spread

esakal

Updated on

कोरोनाच्या उद्रेकानंतर जगाने संसर्गजन्य रोगांच्या धोक्याकडे अधिक गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे. त्या काळात आपण सामाजिक अंतर, क्वारंटाइन असे अनेक शब्द नव्याने शिकलो. अनेकांचा मृत्यू, कित्येक महिन्यांच्या लॉकडाउन व अर्थव्यवस्थेतील घसरणीनंतर जग सावरले. लसीकरणानंतरच स्थिती पूर्वपदावर आली. अशातच काही महिन्यांपासून ‘हंटा विषाणू’ हा शब्द अधूनमधून चर्चेत येत आहे. चीन, अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि काही युरोपीय देशांत या विषाणूमुळे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्याने संशोधकांसह सामान्य नागरिकांच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली आहे. हंटा विषाणू कोरोनासारखा वेगाने पसरणारा नसला, तरी त्याचे गांभीर्य लक्षात घेता जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी तो एक मोठा इशारा समजला जात आहे.

हंटा विषाणू प्रामुख्याने उंदीर, घुशी यांसारख्या प्राण्यांमधून मानवांमध्ये पसरतो. संक्रमित उंदरांची लघवी, विष्ठा किंवा लाळ यांमधून हा विषाणू हवेत मिसळतो आणि श्वसनाद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करतो. विशेषतः अस्वच्छ परिसर, गोदामे, शेतमळे किंवा जंगलाजवळील भागांमध्ये याचा धोका अधिक असतो. हा विषाणू सामान्यतः माणसाकडून माणसात सहज पसरत नाही, ही एक दिलासादायक बाब आहे; मात्र काही प्रकारांमध्ये मानवी संसर्गाची उदाहरणेही आढळली आहेत. नेदरलँड्सच्या एम. व्ही. हाँडियस या क्रूझ जहाजावर या विषाणूचा प्रथम उद्रेक झाला आहे. हे क्रूझ सुमारे चार आठवड्यांपूर्वी अर्जेंटिना येथून निघाले होते आणि त्यावर अंदाजे १५० प्रवासी होते. ते अंटार्क्टिका आणि इतर ठिकाणी थांबले होते. यात डच दांपत्याचा मृत्यू झाला. या क्रूझवरील आणखी चारजणांना संसर्ग झाला आहे. अँडीज प्रकारच्या हंटा विषाणूचा प्रसार झाल्याचे दोन रुग्णांच्या नमुन्यातून समोर आले. यातील एका रुग्णावर दक्षिण आफ्रिकेत अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com