अभिजित सहस्रबुद्धे
बारावी उत्तम मार्कांनी पास झाल्यावर एक दिवस सईनं तिला केलेल्या प्रॉमिसची आठवण आम्हाला करून दिली. आम्ही पुन्हा ते टाळण्याचा प्रयत्न केला, पण तसं घडलं नाही. आपण कुठला कुत्रा घरी आणायचा आहे, कुठून आणायचा आहे याचा सगळा अभ्यास, तयारी तिनं आधीच केलेली होती.