Tiger
esakal
ज्योत्स्ना बडदे
ताडोबा हे ठिकाण फक्त वाघांसाठीच नाही, तर प्रत्येक प्राण्यासाठी, प्रत्येक झाडासाठी खास आहे. तिथं गेल्यावर जाणवतं की निसर्ग किती विशाल आहे आणि आपण त्याच्या तुलनेत किती लहान! ताडोबा खरंच शिकवून जातं - जंगल बोलतं आणि आपण फक्त शांत बसून त्याला ऐकायचं असतं...
माच्या निमित्ताने वर्षभरात अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायची संधी मिळते, पण जंगल सफारी हा अनुभव मात्र नेहमीच वेगळा असतो. कितीही आलिशान हॉटेलं, गजबजलेली शहरं किंवा समुद्रकिनारे पाहिले, तरी जंगलातल्या एका सफारीत जे समाधान मिळतं ते कुठंच मिळत नाही. निसर्गाच्या कुशीत, जिथं प्रत्येक झाड, प्रत्येक पक्षी आणि प्रत्येक आवाज आपल्याशी बोलतो, तिथं गेल्यावरच जीवनाचा खरा अर्थ जाणवतो. म्हणूनच मला दरवर्षी तीन-चारदा तरी जंगलात जायला मिळालं पाहिजे असं वाटतं, कारण तिथं गेल्यावर मनाला एक अवर्णनीय शांतता मिळते.